बीपीसीएलच्या एआय-चलित चॅटबॉट ‘ऊर्जा’ मुळे ग्राहकांचा डिजिटल अनुभव होतोय वृद्धिंगत 

मुंबई भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या महारत्न‘ व फॉर्च्युन ग्लोबल ५०० कंपनीने ऊर्जा‘ ही  इंटेलिजंट व्हर्च्युअल असिस्टंट सुविधा सुरु करत असल्याची घोषणा केली आहे.  ऊर्जा‘ मध्ये एआय/एनएलपी (नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग) क्षमता असून त्यामार्फत आजवर ६०० पेक्षा जास्त यूज केसेसना प्रशिक्षित करण्यात आले आहे. बीपीसीएलचे कस्टमर इंटरफेस सर्वसमावेशक आणि डिजिटली एकीकृत करण्यासाठी ऊर्जा हे चॅटबॉट आता कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध असून व्यवसाय ते व्यवसाय आणि व्यवसाय ते ग्राहक या दोन्हींच्या कोणत्याही प्रश्नशंकांचे याठिकाणी निवारण केले जाईल. स्वयंसेवेचा अखंडित अनुभव ग्राहकांना प्रदान केला जावा आणि त्यांच्या तक्रारी/प्रश्न तातडीने सोडवले जावेत यादृष्टीने हे व्हर्च्युअल असिस्टंट तयार करण्यात आले आहे.

आपल्या विविध टचपॉइंट्सना रिटेल (बी२सी) आणि कमर्शियल (बी२बी) ग्राहकांच्या विशाल समुदायाला बीपीसीएलचा सर्वोत्तम आणि एकीकृत अनुभव सातत्याने प्रदान करत राहण्याच्या उद्देशाने बीपीसीएलने प्रोजेक्ट अनुभव‘ सुरु केला आहे.  प्रोजेक्ट अनुभव अंतर्गत ऊर्जा हा एकीकृत कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म असून याठिकाणी सर्व बीपीसीएल कम्युनिकेशन कोणत्याही चॅनेलला जोडले जातेआणि सर्व कस्टमर टचपॉइंट्स एकाच संलग्न आवाजासह जोडले जातात.  एलपीजी नोंदणीसाठी व्हाट्सऍपवर सहा महिने घेतली गेलेली प्रयोग चाचणी यशस्वी झाल्यानंतर आज ऊर्जा १३ भाषांमध्ये काम करू शकते (इंग्रजीहिंदीतामिळकन्नडमल्याळमतेलगूमराठीगुजरातीओरियाबंगालीपंजाबीउर्दू आणि आसामी) ऊर्जासोबत केले जाणारे ४५% पेक्षा जास्त संभाषण हे गैर-इंग्रजी भाषांमध्ये आहेबीपीसीएलच्या सर्व प्रकारच्या ग्राहकांचा यामध्ये सहभाग असल्याचे यावरून दिसून येते.

देशभरात बीपीसीएलचे ८.५ कोटींपेक्षा जास्त घरगुती एलपीजी ग्राहक असून ६००० पेक्षा जास्त वितरक त्यांना सेवा प्रदान करत आहेत.  देशभरात त्यांचे १९००० पेक्षा जास्त पेट्रोल पंप असून देशाची जवळपास ३०% इंधन गरज बीपीसीएल पूर्ण करत आहे.  याबरोबरीनेच बीपीसीएल विविध उद्योगक्षेत्रांमधील १२ लाखांपेक्षा जास्त बी२बी ग्राहकांच्या इंधनल्युब्रिकंट्स व वायू गरजा देखील पुरवत आहे.  आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ग्राहकांच्या प्रश्नांचे निवारण करण्यात आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यात ऊर्जा महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: