सणासुदीच्या काळात सवलीतीच्या रुपाने साथ द्या; चंद्रकांत पाटील यांचे कोथरूड मधील व्यापाऱ्यांना आवाहन

पुणे : गेल्या दीडेक वर्षात कोरोनानं सगळंच झाकोळलं गेलं आहे, तरीही माणसाने माणसाला केलेल्या मदतीमुळे समाज उभा राहू शकला आहे. आपल्या जगण्यामध्ये आनंदाची पखरण करणाऱ्या सणासुदीच्या काळात एकमेकांना साथ देऊया, असं आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मधील व्यापाऱ्यांना पत्राद्वारे केले आहे. त्याला व्यापारी बांधवांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे.

कोरोनामुळे सर्वांचेच मोठे नुकसान झाले आहे. दुसऱ्या लाटेत तर अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली, तर व्यापाऱ्यांनाही अनेक संकटांचा सामना करावा लागला. आता यातून आपण बाहेर पडत आहोत. अर्थचक्र पुन्हा सुरू होत आहे. त्यातच आगामी काळ हा सणासुदीचा काळ असल्याने, व्यापाऱ्यांनी दिवाळीपर्यंत शक्य असल्यास खरेदीमध्ये सवलत द्यावी, असे पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान पाटील यांच्या आवाहनाला व्यापाऱ्यांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. अनेक व्यापाऱ्यांनी आपल्याला शक्य त्या प्रमाणात खरेदीवर सवलत देण्याचे मान्य केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: