जाणून घ्या: उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमांवर का भडकले

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी राज्य सहकार परिषडेच्या ऑफिसला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते प्रसारमाध्यमांवर भडकले.

राज्य सहकारी बँकेवर EDची छापेमारी आणि कुठलीही चौकशी नाही. तरी ही माध्यमांनी खोट्या बातम्या चालवल्या.मीडियाने विश्वासार्ह बातम्या द्याव्यात, लोकांचा आणि आमचा मीडिया वरचा विश्वास उडत चालला आहे.असे त्यांनी  पुण्यातील पत्रकाराना सांगितले.
राज्य सहकारी बँकेवर राजू शेट्टी यांचा पत्ता कट केला  आणि हेमंत टकले यांना संधी  याही बातम्या कुठून येतात कळत नाही.असेही ते म्हणाले.
माध्यम  खोट्या बातम्या देतांत तरी मात्र आम्ही कायदेशीर कारवाई करणार नाही.असेही पवार म्हणाले. मंदिरे खुली करा हा भावनिक मुद्दा
यावर आंदोलन करून काही पक्ष काहीजण राजकीय इप्सित साध्य करण्याचा प्रयत्न करतायत.असाही टोला त्यांनी आंदोलनकत्यांना लगावला.
इतर राज्यांनी शाळा सुरू केल्या असल्या तरी आम्ही टास्क फोर्सला विचारून निर्णय घेणार राज्यात शाळा चालू करण्यासारखी परिस्थिती नाही काही संघटना शाळा चालू कराव्या असे म्हणत आहे.शाळा दिवाळी पूर्वी सुरू कराव्यात किंवा नंतर असे 2 मतप्रवाह आहेत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील.असेही ते म्हणाले. काही लोकांमुळे सहकारी खाते बदनाम होतय, फटका माझ्या सारख्याला बसतो असा टोला त्यांनी राजू शेट्टी यांना लगावला. मी 40 वर्षे राजकारणात असून मंत्री म्हणून शपथ घेऊन जबाबदारीने बोलत असतो असा टोला त्यांनी नारायण राणे यांना लगावला.

Leave a Reply

%d bloggers like this: