प्रामाणिक कार्यकर्त्याला सर्वांनी पाठबळ द्यावे – रमेश बागवे

पुणे – ” सर्वसामान्यांच्या अडचणीमध्ये पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या, सामान्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याला सर्वांनी पाठबळ द्यावे, असे आवाहन माजी गृहराज्य मंत्री व शहर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केले.

येरवडा पर्णकुटी पायथा येथे कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस विल्सन चंदेवळ व युवक कॉंग्रेस सरचिटणीस ज्योति चंदेवळ यांच्या प्रयत्नातून 24 इंच व्यासाच्या ड्रेनेज लाइनच्या कामाचे भूमिपूजन रमेश बागवे यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशचे सरचिटणीस ऍड. अभय छाजेड,युवक शहराध्यक्ष विशाल मलके, राजेंद्र शिरसाठ, अरुण वाघमारे, विठ्ठल गायकवाड, रमेश सकट, बाबा नायडू, समीर शेख, राहुल शिरसाठ, विनय माळी, शिरील आशिर्वादम, अविनाश निकशे, विलास पुनवटकर, आज्जु खान, इलियास शेख, युनुस अन्सारी, सुशिला जोसेफ, बेगम खाला, आशा भातकर, ललिता बारंगळे, रुक्‍सना शेख आदि उपस्थित होते.

सत्ता असतानाही जे नगरसेवक करू शकले नाही ते कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी करुन दाखविले. वर्षानुवर्ष ड्रेनेजचे पाणी तुंबण्याचा गंभीर प्रश्‍न प्रलंबित होता. यामुळे येरवडा गावठाण, कुंजीर वाडा, शनी आळी या भागातील नागरिकांना खूपच त्रास होत होता. पावसाळ्यात हा त्रास अधिकच वाढला होता. ही ड्रेनेज लाइन टाकल्याने हा प्रश्‍न सुटणार आहे. ड्रेनेज लाइन न टाकता केवळ जेटिंग मशिनद्वारे चेंबर्स साफ करण्याचे काम गेल्या अनेक दिवसापासून सुरु होते. या परिसरातील रस्त्यावरील खड्डे बुजविणे हीच कामे मागील साडेचार वर्षात केल्याचा आरोप चंदेवळ यांनी यावेळी केला. नागरिकांच्या अडचणी जाणून विल्सन चंदेवळ यांनी पालिकेतील आयुक्‍तांचा विशेष निधी मिळवून हे काम मार्गी लावले. ड्रेनेज लाईनच्या या महत्वपूर्ण विकास कामाबद्दल स्थानिक नागरिकांनी काँग्रेस पक्ष व विल्सन चन्देवळ यांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

%d bloggers like this: