उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विकास अनाथ आश्रमासाठी बसगाडीचे लोकार्पण

पुणे : विकासभाऊ साने सोशल फाउंडेशनच्यावतीने चिखली ता.हवेली येथील विकास अनाथ आश्रमासाठी बसगाडीचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हेाते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, श्री विकास साने, आश्रमाचे व्यवस्थापक माऊली हरकळ, प्रवीण पिंजन आदि मान्यवर उपस्थित होते. विकास सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून चालविण्यात येत असलेल्या विकास अनाथ आश्रमासाठी अनाथ विद्यार्थ्यांच्या सेवेत ही बसगाडी दाखल होत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: