बेसिकफर्स्टने शिक्षक दिनाचे औचित्त्य साधून आपल्या शिक्षकांसाठी ईएसओपीची घोषणा केली

नवी दिल्ली :. झारखंड इनोव्हेशन लॅबद्वारे निवडलेली एडटेक क्षेत्रातील बेसिकफर्स्ट या कंपनीने शिक्षक दिन साजरा करण्याच्या आणि आपल्या शिक्षक व प्रशिक्षकांच्या उत्तम समाजाची बांधणी करण्यातील कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने टीचर्स स्टॉक ऑप्शन्सची (टीएसओपी) घोषणा केली. या मंचावरून पूर्णवेळ आणि अर्धवेळ कार्यरत असलेले १५० पेक्षा अधिक शिक्षक ईएसओपीसाठी (कर्मचारी समभाग पर्याय) पात्र असतील आणि त्यामध्ये शिक्षकांचा कंपनीतील कार्यकाळ लक्षात घेण्यात येईल

शिक्षक दिनाच्या निमित्ताने या उपक्रमाची घोषणा करताना बेसिकफर्स्ट लर्निंगचे संस्थापक आणि कार्यकारी संचालक रणधीर कुमार म्हणाले, “शिक्षक दिनाच्या निमित्ताने देशातील शिक्षकी पेश्याचा सन्मान करण्याची आम्हाला संधी मिळते आहे. शिकणे कधीच थांबत नसते आणि अवघड परिस्थितीमध्ये देखील कोणताही विद्यार्थी मागे पडणार नाही यासाठी शिक्षकांनी अप्रतिम नेतृत्त्व दर्शवले आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याचे उदाहरण घालून दिले आहे. आम्हाला आपल्या टीचर्स स्टॉक ऑप्शन्स (टीएसओपी) च्या मार्फत त्यांचे आभार मानायचे आहेत आणि त्याचबरोबर या उपक्रमाच्या माध्यमातून बेसिकफर्स्टच्या यशामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांचा गौरव करायचा आहे. या माध्यमातून आम्हाला आमचे यश शिक्षकांसोबत वाटून घ्यायचे आहे, ज्यामुळे त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची संपन्नता वाढेल आणि ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाची आमच्या संस्थेशी असलेली सहकार्याची भावना देखील वाढेल व या संपूर्ण जबाबदारीला सहकार्याचे रूप मिळू शकेल. आमच्या १५० हून अधिक अत्यंत अनुभवी शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर खूप मेहनत घेतली, त्यांच्यावर लक्ष दिले आणि श्रेणीतील सर्वोत्तम असलेल्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक अनुभवातून त्यांची ध्येये पूर्ण करण्याच्या दिशेने त्यांची वाढ केली.”

बेसिकफर्स्ट हा नव्याने सुरू झालेला स्टार्टअप आहे, जो जेईई, एम्स, एनटीएसई, नीट आणि ऑलिंपियाड्ससाठी वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम प्रदान करतो. त्याचबरोबर ६वी ते १२वी इयत्तांमधील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम प्रदान करतो. यामार्फत आवश्यकतेनुसार इंटरॅक्टिव्ह शैक्षणिक सामग्री देण्यात येते, जी प्रशिक्षक/ शिक्षकांद्वारे त्यांच्या विद्यार्थ्यांसोबतच्या संवादातून घडवण्यात येते. ऑनलाइन प्रशिक्षण प्लॅटफॉर्मवर एआयएमएल तंत्रज्ञानाने युक्त आहे, ज्यातून विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील रूची वाढते आणि संपूर्ण अनुभवातच भर पडते. वैयक्तिक स्वरूपातील ई-लर्निंग सेशनमुळे विद्यार्थ्यांमध्ये महत्त्वाची संभाषण कौशल्ये, बुद्धिमत्ता, विषयातील समज आणि शैक्षणिक ध्येयांची साध्यता वाढवण्यासाठी, स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी आणि आपले करिअर यशस्वी करण्यासाठी आवश्यक मुलभूत कौशल्यांची भर पडते.

Leave a Reply

%d bloggers like this: