भविष्यातील धोका टाळण्यासाठी तापमानवाढ थांबवणे गरजेचे – हवामानशास्त्रज्ञ डॉ. एम. सी. वार्ष्णेय यांचे मत

पुणे : “कृषी शिक्षण देताना पदवीधारकांना अधिकाधिक सक्षम बनविणेसाठी कृषी स्टार्टअप प्रकल्प देणेकृषी आधारित यशस्वी उद्योगांचा त्यांच्याकडून अभ्यास करून घेणेनवीनवीन तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करणे अशा विविध बाबी अंतर्भूत करणे गरजेचे आहे. कृषी संशोधनासाठी निधी वाढविणे गरजेचे आहे. शेतकरीत्याचबरोबरच कृषी क्षेत्रात कार्य करणारे प्राध्यापक व शास्त्रज्ञ यांना आत्मसन्मान मिळणे हे महत्वाचे आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांच्या मुलांचा उत्साह वाढून ते शहराकडे न वळता शेती करण्यासाठी प्रवृत्त होतील.” असे प्रतिपादन सेंटर फोर एज्युकेशनरिसर्च एन्ड ग्रोथ (सीईआरजी)नवी दिल्लीचे उपाध्यक्ष व सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी केले.

कृषी महाविद्यालय, पुणे येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र व ग्रामीण विकास व शिक्षण संस्थापुणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन शेतकरी-शास्त्रज्ञ चर्चासत्रामध्ये ते  बोलत होते. आनंद कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू व हवामानशास्त्रज्ञ डॉ. एम. सी. वार्ष्णेय,  महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटीलपुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकरआधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान प्रकल्पाचे समन्वयक डॉ. सुनिल गोरंटीवार, कृषि हवामानशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. जयवंत जाधव व जलहवामान शास्त्रज्ञ डॉ. विजय स्थूल उपस्थित होते. 

डॉ. प्रशांतकुमार पाटील म्हणाले, “जगभरात मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड व मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे हवामानात बदल होत आहेत. वाढते तापमान, दुष्काळ, वादळ, ढगफुटी, अवेळी पाऊस यामधून त्याचा प्रत्यक्ष अनुभव आज आपण घेत आहोत. या बदलत्या हवामानाचा पीक उत्पादनावर परिणाम होत असून, त्यावर मात करणेसाठी अत्यानुधिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. हवामान बदलामुळे नवीन किडी दिसून येत आहे. रोग व तणांचे प्रमाण वाढत आहे. शेतकऱ्यांबरोबरच कृषी विद्यापीठांना बदलत्या हवामानाचा फटका बसत आहे. कमी कालावधीत तयार होणाऱ्याकमी पाण्यावर तग धरू शकणाऱ्या तसेच कीड व रोगास प्रतिकार करू शकणाऱ्या पिकांच्या जातीहवामानाबद्दल पूर्वसूचना देणारे मॉडेल्स व त्या अनुषंगाने शेतीविषयक सल्ला देणारी यंत्रणा अशा विविध तांत्रिक बाबींवर संशोधन होणे आवश्यक आहे. 

प्रा. वार्ष्णेय म्हणाले, “वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाणवृक्षतोडवणवाऔष्णिक विद्युत केंद्र अशा विविध कारणांमुळे वातावरणातील तापमान वाढत आहे. तापमान वाढीचा भविष्यातील धोका लक्षात घेता तापमान वाढ थांबविणेसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. बदलत्या हवामान परीस्थितीमध्ये विविध पिकांच्या मॉडेल्सवर अभ्यास होणे महत्वाचे असून त्यानुसार पिक नियोजन करणे आवश्यक आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: