fbpx

येरवडा भागातील गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

पुणे -येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांची आगामी गणेश उत्सवाबाबत महत्वपूर्ण बैठक येरवडा येथील वीर लहुजी वस्ताद सांस्कृतिक हॉल येथे पार पडली. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख,महापालिका सहाय्यक आयुक्त वैभव कडलक यांनी मार्गदर्शन केले.

सर्व गणेश मंडळांनी कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.  महापालिका आयुक्त व पोलिस आयुक्त यांनी शासनाच्या वतीने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे सर्व मंडळांना बंधनकारक राहील. सार्वजनिक गणेश मंडळांनी कोरोना  पार्श्वभूमीवर विधायक उपक्रम राबवावेत.मास्क, सॅनिटायझर,डिस्टंसिंगचे पालन करणे बंधनकारक राहील. आगमन किंवा विसर्जन मिरवणुका यांच्यावर पूर्णपणे बंदी आहे. विसर्जन सार्वजनिक ठिकाणी न करता मंडळाचे जवळ महापालिका फिरते हौदात किंवा मूर्तीदान करावे. गणेशोत्सव मंडळांनी आरती व इतर उपक्रम फेसबुक व सोशल मीडियाच्या माध्यमातून आयोजित करून गर्दी टाळण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन करण्यात आले. पोलीस निरीक्षक गुन्हे विजयसिहं चौहान यांनी आभार मानले. 

Leave a Reply

%d bloggers like this: