इकोल स्पोर्ट्स फाउंडेशन – केडन्स, ब्रिलियंट्स, जिल्हा संघाची आगेकूच

पुणे : केडन्स, ब्रिलियंट्स, जिल्हा संघांनी अनुक्रमे पूना क्लब, मेट्रो क्रिकेट क्लब व २२ यार्ड्स संघाला पराभूत करताना इकोल स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत आपली आगेकूच कायम राखली.पूना क्लब मैदानवर झालेल्या केडन्स संघाने पुना क्लब संघाला ७ गडी राखून पराभूत केले. पूना क्लब संघाने ४३.५ षटकांत सर्वबाद १८२ धावा केल्या. लढतील पाऊस आल्याने केडन्स संघाला ४३ षटकांत १५८ धावांचे लक्ष्य मिळाले. या धावा केडन्स संघाने २८.५ षटकांत ३ गाड्यांच्या मोबदल्यात करताना विजय साकारला. ५ गडी बाद करणाऱ्या व ४८ धावांची दमदार खेळी करणाऱ्या आर्शिन कुलकर्णी याला सामनावीर घोषित करण्यात आले.

येवलेवाडी येथील मैदानवर झालेल्या लढतीत ब्रिलियंट्स संघाने मेट्रो संघाला ८ गडी राखून पराभूत केले. मेट्रो संघाने प्रथम फलंदाजी करताना ४०.२ षटकांत सर्वबाद १७५  धावंपर्यंत मजल मारली. मेट्रोच्या यश बर्गे यांने ५९ धावांची झुंजार खेळी केली. पावसाच्या व्यत्ययामुळे ब्रिलियंट्स संघाला सुधारित आव्हान मिळाले. ब्रिलियंट्स संघाने २ बाद १३४ धावा, रोहन शिंदे (४५), आकाश पेडणेकर (नाबाद ३४) व अनुप भराडे (२३) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर २३.४ षटकांत पार करताना विजय मिळवला.

बारणे अकादमी मैदानावर झालेल्या लढतीत जिल्हा संघाने २२ यार्ड्स संघावर सरासरी धावसंख्येच्या जोरावर विजय मिळवला. पावसामुळे ४३ षटकांच्या  झालेल्या या लढतीत २२ यार्ड्स संघाने ९ बाद १६४ धावांपर्यंत मजल मारली. यावेळी ओंकार पटकल याने भेदक गोलंदाजी करताना ४ गडी बाद केले. जिल्हा संघाने ३७ षटकांत ७ बाद १४६ धावंपर्यंत मजल मारली. पुन्हा पावसाचा व्यत्यय आल्याने जिल्हा संघाला सरस सरासरीच्या जोरावर विजयी घोषित करण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: