fbpx

पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाच्या 107 रुग्णांना डिस्चार्ज


पुणे:  शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या पुढे आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन हजाराच्या पुढे आली आहे  . गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 222नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 107रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात  आले आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 96हजार  100 इतके कोरोना बाधित रुग्ण  आढळून आले आहेत. त्यापैकी 4 लाख 84हजार 691ईतके रुग्ण बरे झाले आहेत.

पुण्यात गेल्या 24 तासात 16रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील4तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील12रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8935जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 2474अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 204रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 9484स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणेमहापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: