fbpx

‘इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप’ च्या सदस्यता अभियानास प्रारंभ

पुणे : समाजातील समस्या, नागरी हक्क आणि न्याय या मुद्दयांवर लढा देण्यासाठी स्थापन झालेल्या ‘इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप ‘ या संस्थेच्या राज्यव्यापी सदस्यता अभियानास प्रारंभ झाला आहे.

राज्यातील सर्व जिल्हयातील स्वयंसेवी, सेवाभावी कार्य करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी, लोकशाही ची लढाई आणि न्याय आणी हक्काच्या लढाईत सामील होण्याकरीता 8805485719 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन असलम इसाक बागवान ,संस्थापक अध्यक्ष इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप यांनी केले आहे.

ही महाराष्टृ मधिल विविध जिल्हा आणि गावातील समाजसेवकांचा समूह असून हि संस्था “संविधानीक मार्गाने ” समाजातील समस्या, नागरीक हक्क आणि न्याय यासाठी लढा देत असते. हि संस्था सेक्युलर असून छत्रपती शिवाजी महाराज मौलाना अबुल कलाम आझाद, बँ, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी,महात्मा फुले,शाहू महाराज , मदर टेरेसा, आण्णाभाऊ साठे, लहूजी उस्ताद व इतर महामानवाचे आदर्श डोळ्यासमोर ठेऊन नि:स्वार्थीपणे संघर्ष करीत असते.

या संघटनेच्या माध्यमातून मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षण यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केले. सी ए ए कायद्याविरोधात सपुर्ण भारतात भारतजोडो अभियान राबविले. नोकरी मेळावे, आरोग्य शिबीर, महामानवाच्या जयंती तथा पुण्यतिथी साजरी करणे ,कोविड 19 च्या काळात गरिबांना सुके राशनकिट तथा प्रवासी मजूरांना तयार जेवण पुरवठा, रक्तदान शिबीरे, समाजसेवक, पत्रकार, सफाईकामगार, दहावी बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश प्रात केलेल्या विध्यार्थीचे सन्मान करणे इत्यादी कार्य केले आहे.

शिवाय भारतात आणि आपल्या वार्डात लोकशाही रूजावी व प्रत्येक नागरीकांना अन्न, पाणी, शिक्षण, रोजगार आणि इतर सोयीचा आधिकार प्राप्ती करीता कार्यरत तसेच महिला सबलिकरण बचत गट स्थापन, विधवा, अपंग, जेष्ठ नागरिक यांच्या योजना त्याच्या पर्यत पोहचविणे हे कामही केले आहे.

दिल्लीमध्ये सूरू असलेल्या किसान आंदोलनास समर्थन म्हणून 21 दिवसाचे किसानबाग नावाने सत्याग्रह, नागरीकांच्या मुलभुत आधिकारासाठी महानगरपालीकेवर आंदोलने इत्यादी कार्य इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान यांनी केले.

या मध्ये विविध समाजसेवकांचा या कार्यात हातभार राहिलाच शिवाय विविध समाजसेवकांच्या नेतृत्वाखाली सामाजिक मुद्यांवर, पुणे, सातारा, सोलापूर, पंढरपूर, बार्षी, उ, बाद, बिड, औरंगाबाद, सिल्लोड, भुसावळ इत्यादी ठिकाणी सामाजिक मुद्यावर आंदोलने, धरणे, रास्तारोको आंदोलन, पदयात्रा, सायकल रँली, मोटारसायकलवर संपूर्ण भारतात भारतजोडो आभियान हे उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: