मराठा आरक्षणासाठी शिवसंग्रामच्या वतीने धरणे आंदोलन

पुणे : शिवसंग्राम, पुणे जिल्हा यांचे वतीने, मराठा आरक्षणाचा तिढा तसेच समाजाच्या इतर समस्यांवर राज्य सरकारने सकारात्मक भूमिका तातडीने घ्यावी यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकविण्या बाबतीत, मंत्रिमंडळाच्या मराठा विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी मराठा समाजाची निराशा केलेली आहे. जे विषय राज्य सरकारच्या पुर्णतः हातात आहेत त्याबाबतीतही चव्हाण दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे त्यांची अध्यक्षपदावरून त्वरित हकालपट्टी करण्यात यावी तसेच राज्य मागासवर्ग आयोग ज्यावर सर्व मराठा विरोधी सदस्यांचा भरणा आहे तो आयोग तातडीने बरखास्त करावा, राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या ओबीसींप्रमाणे सर्व सवलती मराठा समाजाला लागू कराव्यात या अशा अनेक मागण्या असलेले निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
सदर निवेदन जिल्हाधिकारी यांचे वतीने उपजिल्हाधिकारी श्रीमती मंजिरी गोंजारे यांनी स्वीकारले.

या धरणे आंदोलनात शिवसंग्रामचे प्रदेश प्रवक्ते तुषार काकडे, प्रदेश सचिव शेखर पवार, शहराध्यक्ष भरत लगड, प्रदेश महिला उपाध्यक्षा संगीता घुले, महिला शहराध्यक्षा कालिंदी गोडांबे, युवक शहराध्यक्ष नितीन ननावरे, समीर निकम, कल्याणराव अडागळे, विनोद शिंदे, किशोर मुळूक, बाळासाहेब चव्हाण, निशा गायकवाड, सुरेश थोरात, अभिजित म्हसवडे, भरत फाटक, अमित शिंदे, सागर फाटक, सुजाता ढमाले, दिलीप पेठकर, लहू ओहोळ, केशव बालवडकर, चेतन भालेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Leave a Reply

%d bloggers like this: