कोरोना सुरक्षित शिक्षण अभियान


पुणे:शाळा,महाविद्यालय,विदयापीठ कोरोना कारणाने बंद आहेत .हा बंद कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना करून सुरू करणे .हे सर्वांच्या शैक्षणिक भविष्यासाठी आवश्यक आहे यातच समाजाचे देशाचे हित सामावले आहे. या विषयावर शिक्षणप्रेमी जनतेची ऑनलाइन सभा योजली आहे . या ऑनलाईन सभेमध्ये प्रमुख सहभाग डॉक्टर पंडित विद्यासागर माजी कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, डॉक्टर मुरलीधर चांदेकर माजी कुलगुरू, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ डॉक्टर आर एस एस माळी माजी कुलगुरू, कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ डॉक्टर दिलीप देवधर, ज्येष्ठ आरोग्य तज्ञ डॉक्टर अ. ल देशमुख, ज्येष्ठ शिक्षण तज्ञ पुणे मुख्याध्यापक हरिश्चंद्र गायकवाड मुख्याध्यापक महासंघ पुणे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत डीजी भारती एजूकेशन फाउंडेशन चे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी माहिती दिली.


या पत्रकार परिषदेला राजेंद्र खारुल, अंकिता कारुलकर संचालक डीजी भारती एज्युकेशन फाउंडेशन उपस्थित होते.
अंकिता कारुलकर म्हणाल्या, शिक्षण क्षेत्रातील सर्व गैरव्यवहार संपले पाहिजेत. यासाठी शिक्षण क्षेत्रातील सर्व संबंधित घटकांनी एकत्र येऊन कृती योजना ठरवली पाहिजे. कोरोना मुक्त शिक्षण अभियान सुरू करणे काळाची गरज आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करून शाळा महाविद्यालये विद्यापीठे कसे सुरू करता येतील. याचा कृती आराखडा तयार करण्याची गरज आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: