वैजापूरचे माजी आमदार आर.एम. वाणी यांचे निधन

औरंगाबाद : शिवसेना नेते आणि वैजापुरचे माजी आमदार रंगनाथ मुरलीधर उर्फ आर.एम. वाणी यांचे मंगळवारी रात्री औरंगाबाद येथील खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांनी १९९९ ते २०१४ या कालावधीत सलग तीन पंचवार्षिकमध्ये विधानसभेत वैजापूर मतदारसंघात शिवसेनेचे प्रतिनिधीत्व केले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.

औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणात आर.एम. वाणी या नावाने सुप्रसिद्ध असलेल्या वाणी यांनी १९८४ ते १९९४ या कालावधीत वैजापूरच्या नगराध्यक्षपदावर कार्यरत होते. त्यांनी एकाच मतदारसंघातून, एकाच पक्षातून तब्बल पंधरा वर्षे म्हणजेच1999 ते 2014 पर्यंत आमदारकी भूषवली. या काळात त्यांनी विविध विकासाची कामे हाती घेतली. तसेच महाराष्ट्र विधानसभेवर असताना त्यांनी अनेक जनकल्याणाचे प्रश्न सभागृहात उपस्थित केले. शहरासह व ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी,सिंचन प्रकल्प,कृषी विकास, आरोग्य, सहकार, शैक्षणिक, सामाजिक प्रश्नावर त्यांनी अत्यंत प्रभावीपणे काम करत प्रामाणिक भूमिका बजावली.गेल्या वेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत वाणी यांनी स्वतःहून आमदारकीचं तिकिट नाकारलं होतं. आता इतरांना संधी मिळावी, असं शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना त्यांनी कळवलं होतं.

Leave a Reply

%d bloggers like this: