भारतीय दलित कोब्राच्यावतीने दलित सन्मान मोर्चाचे आयोजन

पुणे : दलित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात दलित कोब्रा संघटनेच्यावतीने पुणे स्टेशन परिसरातील आंबेडकर पुतळा परिसरात आंदोलन करण्यात आले. शासनाच्या विविध खात्यात दलित अधिकारी आणि कर्मचारी यांना बदनाम करुन त्यांच्यावर दबाव टाकण्याचे काम त्यांचे वरिष्ठ करत आहेत. तसेच बिल्डरांच्या हिताकरता शहरासह उपनगरातील झोपडापट्टी जबरदस्तीने हटविण्याचे काम महापालिकेतील आणि राज्यातील सत्ताधारी करत आहेत. त्यांचा हा डाव हाणून पाडण्याकरता ‘दलित सन्मान मोर्चा’ काढण्यात आला असल्याची माहिती भारतीय दलित कोब्राचे संस्थापक अ‍ॅड. भाई विवेक चव्हाण यांनी दिली.

यावेळी बार्टी आणि यशदा चे निवृत्त संचालक रविंद्र चव्हाण, निवृत्त अधिकारी नरेंद्र भगतकर, निवृत्त जिल्हा शल्य चिकित्सक प्रताप वाघमारे, प्रा. डॉ. माधव गवई, राहुल डंबाळे, श्याम गायकवाड, सारिका बोरडे, गुलाब कांबळे, सचिन भालेराव, दत्ता पोळ, रितेश गायकवाड, स्वप्निल वाघमारे, राहूल बोरडे उपस्थित होते.

मोर्चाचे मुख्य संयोजक संतोष तायडे म्हणाले की, गेल्या काही दिवसांमध्ये अनुसुचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर खोटेनाटे आरोप करुन त्यांची बदनामी केली जात आहे. त्यांचे मनोबल खच्ची करुन त्यांच्यावर दबाव टाकून तणावात ठेवले जात आहे. अ‍ॅड. भाई विवेक चव्हाण हे राज्यात दलितांचे वकील म्हणून ओळखले जातात. केवळ जातीय भावनेतून त्यांना कोर्टाच्या कामकाजामध्ये सहभाग घेऊ दिला गेला नाही. उलट त्यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल केल्यामुळे दलितांच्या भावना संतप्त झाल्या आहेत. दलितांना निर्भय व प्रामाणिकपणे काम करता यावे याकरिता दलित सन्मान मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे संतोष तायडे यांनी सांगितले.

अ‍ॅड. भाई विवेक चव्हाण म्हणाले, यापुढे जर दलित अधिकारी आणि झोपडवपट्टी धारकांवर अन्याय केल्यास हटके पध्दतीने दलित कोब्राच्या वतीने उत्तर दिल जाईल.

Leave a Reply

%d bloggers like this: