PMP – अटल बस सेवेअंतर्गत हडपसर ते संकेत विहार (फुरसुंगी) नवीन बसमार्ग सुरू

पुणे : पीएमपीएमएल कडून अटल बस योजनेअंतर्गत मार्ग क्रमांक एच ११/१  हडपसर ते संकेत विहार (फुरसुंगी) हा नवीन बसमार्ग दि. २८ ऑगस्ट २०२१ पासून सुरू करण्यात आला. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या बससेवेचे उदघाटन करण्यात आले. फुरसुंगीचे माजी उपसरपंच संजय हरपळे व माजी सरपंच . सुधा संजय हरपळे यांच्या पाठपुराव्यातून ही बस सेवा सुरू झाली. सदरची बस सेवा अटल बस सेवेअंतर्गत असल्याने प्रवासी नागरिकांना फक्त पाच रुपये एवढ्या अत्यल्प व किफायतशीर दरात बस सेवा उपलब्ध होणार आहे.

यावेळी  संजय हरपळे,  सुधा संजय हरपळे, पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, नियोजन व संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्ग क्रमांक एच ११ हडपसर ते संकेत विहार या बससेवेचा मार्ग हडपसर गाडीतळ, भाजी मंडई, काळे कॉलनी, गणेश विहार, समृद्धी हॉटेल, न्हावले वाडा, महादेव मंदिर, रेल्वे गेट, ड्रीम आकृती सोसायटी, ड्रीम रचना, ढेरे कंपनी, संकेत विहार असा असणार आहे. सध्या ही बस सेवा दर तासाला उपलब्ध असून प्रवासी संख्या व उत्पन्न वाढल्यास या मार्गावर आणखी बसेस वाढवल्या जातील.

याप्रसंगी बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ” पीएमपीएमएल ने हा नवीन बस मार्ग सुरू केल्याने संकेत विहार परिसरातील नागरिकांचा सार्वजनिक वाहतूक सेवेचा प्रश्न कायमचा दूर होणार आहे. पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी जिथे मागणी होईल तिथे तत्परतेने बससेवा सुरु केली आहे. त्याबद्दल पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो.”

सुधा हरपळे म्हणाल्या, ” संकेत विहार येथील सर्वसामान्य नागरीक स्वतःची खाजगी वाहने पार्किंगला लावून पीएमपीएमएलच्या बसचा जास्तीत जास्त वापर करतील व भरघोस प्रतिसाद देतील.”

Leave a Reply

%d bloggers like this: