निओबँक फ्रीओची इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेशी भागीदारी

मुंबई : भारतातील अशा प्रकारच्या पहिल्या, पत-अग्रेसर निओबँकेने इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेच्या सहकार्याने फ्रीओ सेव्ह नावाचे शून्य शिल्लक बचत खाते सुरू करण्याची योजना बाजारात आणली आहे. संस्थापकांनी यापूर्वी मनीटॅप योजनेद्वारे कर्ज आणि क्रेडिट व्यवसायाला ४४०० कोटींपेक्षा जास्त वितरणासह आर्थिक बळ दिले. आयुष्यभर ग्राहकांच्या आर्थिक प्रवासाच्या प्रत्येक पावलात सक्षमतेने मदत करण्यासाठी वित्तीय उत्पादनांचा एक संच देण्याच्या वचनपुर्तीसाठी फ्रीओ ब्रँडच्या दिशेने ही मोठी झेप गणली जाईल.

फ्रीओ सेव्ह ग्राहकांना माहितीवर आधारित आर्थिक निर्णय घेण्याची आणि या प्रक्रियेत त्यांचे क्रेडिट प्रोफाइल मजबूत करण्याची मुभा देते. इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने सुलभ केलेले खाते ७% (१ लाख रुपये आणि त्यापेक्षा जास्त शिल्लक) वर्ग व्याजदराची सर्वोत्तम ऑफर तर देतेच, यासोबतच जागतिक दर्जाची ग्राहक सेवा आणि निधी हस्तांतरण आणि बिल देयके सुलभ करण्यासाठी युपीआय प्लॅटफॉर्मशी अविरतपणे जोडले गेले आहेत.

फ्रीओचे सहसंस्थापक अनुज कक्करम्हणाले, “फ्रीओमध्ये, योग्य दिशेने हळूवारपणे पाऊल टाकत आपल्याला पैसे वाचविण्यात, ते हुशारीने खर्च करण्यास आणि वित्तीय सुबत्ता तयार करण्यास कशी मदत करू शकतात हे आम्हाला समजते. इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेबरोबर आमचे फ्रीओ बचत खाते सुरू केल्यामुळे ग्राहकांना त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्गाकडे अधिक चांगली पावले उचलण्यास मदत करण्याचे आमचे उद्दीष्ट आहे. आमचा असा विश्वास आहे की, लोकांना त्यांच्या खर्चाच्या पद्धतींचे विश्लेषण करण्याची आणि लहान पावले उचलण्याची शक्ती आहे जी त्यांना केवळ थोड्या मदतीने त्यांचे क्रेडिट स्कोअर तयार करण्यास आणि बळकट करण्यास मदत करू शकते. किंबहुना, फ्रीओच्या छताखाली आपली सर्व वैशिष्ट्ये आणि उपाय काळजीपूर्वक हा उद्देश साध्य करण्यासाठी आणि वापरकर्त्यांना भीती न बाळगता खर्च करण्याचे स्वातंत्र्य प्रदान करण्यासाठी आणि त्यांच्या सर्व आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना अतिरिक्त सुविधा देण्यासाठी डिझाइन केले गेले आहेत.”

Leave a Reply

%d bloggers like this: