पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 243 नवीन रुग्ण

पुणे: शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या पुढे आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन हजाराच्या पुढे आली आहे  . गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 243नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 208रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात  आले आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 95हजार  586 इतके कोरोना बाधित रुग्ण  आढळून आले आहेत. त्यापैकी 4 लाख 84हजार 395ईतके रुग्ण बरे झाले आहेत.

पुण्यात गेल्या 24 तासात 8रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील6तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील2रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8926जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 2265अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 204रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 7840 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणेमहापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: