Pune Crime – फुरसुंगीत पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पुणेः पुणे पोलिस दलातील एका कर्मचा-याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी (दि. 30) दुपारी ही घटना घडली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

राजेश महाजन (वय 50 रा. हरपळे वस्ती, फुरसुंगी ) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचा-याचे नाव आहे. ते पीएमटी विभागात नेमणुकीस होते. मिळालेल्या माहितीनुसार, महाजन हे पूर्वी सैन्यात होते. त्यानंतर ते पुणे पोलिस दलात दाखल झाले होते. पोलिस शिपाई म्हणून ते कार्यरत होते. ते पीएमटी विभागात नेमणुकीस होते. आज दुपारी त्यांनी हडपसरमधील फुरसुंगीच्या हरपळे वस्तीतल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे.

या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी धाव घेतली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. हडपसर पोलिस तपास करत आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: