पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 128 नवीन रुग्ण तर 171 रुग्णांना डिस्चार्ज
पुणे: शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या शंभरच्या पुढे आली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन हजाराच्या पुढे आली आहे . गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 128नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 171रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 95हजार 343 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 4 लाख 84हजार 187ईतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 29रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील16तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील12रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8922जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 2234अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 198रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6802 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणेमहापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
