Sunday, September 27, 2026
Latest NewsPUNE

पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 247 नवीन रुग्ण तर 249 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे:  शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दोनशे च्या   वर आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन हजाराच्या पुढे आली आहे  . गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 247नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 249रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात  आले आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 95हजार  215 इतके कोरोना बाधित रुग्ण  आढळून आले आहेत. त्यापैकी 4 लाख 84हजार 016ईतके रुग्ण बरे झाले आहेत.

पुण्यात गेल्या 24 तासात 7रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील6तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील1 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8917जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 2282अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 207रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 7601 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणेमहापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading