परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस

मुंबई : परिवहन मंत्री आणि शिवसेने नेते अनिल परब यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. अनिल परब यांना मंगळवारी चौकशी साठी ईडी कार्यलयात हजर राहण्यास सांगितले आहे. अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावली आल्याची माहिती शिवेसना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत जन आशीर्वाद यात्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली असे म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात सुरु असलेल्या वादात आता नवा मुद्दा सामील झाला आहे. यामुळे भाजप शिवसेनेतील वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांनी रविवारी महाविकास आघाडी सरकारमधील बरेच मंत्री ईडी आणि सीबीआयच्या रडावर असल्याचे म्हटलं होते.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली . वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र” अशा शब्दात संजय राऊत यांनी अनिल परब यांच्या नोटीसवरुन भाजपवर निशाण साधला आहे. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा नारायण राणेंना केंद्रस्थानी ठेवून भाजपवर आरोप केला आहे.

दरम्यान, अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी अनिल परब यांनी म्हटलं आहे की, ईडीची नोटीस संध्याकाळी भेटली आहे. ३१ ऑगस्ट रोजी ११ वाजता हजर राहण्यास सांगितले आहे. यामध्ये कुठल्याही प्रकरणाचा विशेष असा उल्लेख केला नाही. यामुळे कशा करता ही नोटीस पाठवण्यात आली आहे याबाबत काही सांगता येत नाही. नोटीसमध्ये विषय सांगितला नसल्यामुळे काही समजले नाही असे अनिल परब यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अनिल परब यांनी म्हटलं आहे की, या नोटीसमध्ये फक्त चौकशीचा भाग असल्याचे सांगितले आहे. साधारण आम्हाला अपेक्षा होती त्यामुळे कायदेशीर सल्ला घेऊन उत्तर देऊ. कारण जाणून घेईपर्यंत काही उत्तर देणार नाही. कायदेशीर बाबींचा अभ्यास करुन चौकशीला हजर राहण्याचा निर्णय घेण्यात येईल असे  परब यांनी म्हटलं आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: