BIG BREAKING – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मंजूर

महाड :  राज्यात आज दिवसभर राणे विरूद्ध शिवसेना हा ‘हाय होलटेज ड्रामा’  बघायला मिळाला.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावून तत्काळ   जामीन मंजूर झाला आहे. महाड येथील न्यायदंडाधिकारी बाबासाहेब पाटील यांच्या कोर्टासमोर नारायण यांना हजर करण्यात आले होते. सरकारी वकिलांनी सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती.  तर अॅडवोकेट अनिकेत निकम यांनी नारायण राणे यांची बाजू मांडली.

नारायण राणे हे जबाबदार व्यक्ती आहेत, मग बेजबाबदार पणे का वागतात? जबादार व्यक्तींनी अशी वक्तव्य करणं योग्य नाही,  फिर्यादीवर दबाव आणू शकतात, आणखी काही वक्तव्य करू शकतात असा युक्तिवाद  सरकारी वकिल भूषण साळवी यांनी केला.  नारायण राणे  यांच्या वकिलांनी राणे यांच्यावरील आरोप फेटाळत त्यांच्या वयाचा, आरोग्याच्या प्रश्नावर जामीन द्यावा अशी मागणी न्यायाधीशांकडे केली होती.

दरम्यान, नाशिक आणि पुणे पोलीसांच्या टीमही महाडमध्ये पोहचल्याची माहिती सूत्रांनी दिली असून कोकण आय जी संजय मोहिते, पोलीस अधीक्षक अशोक दुधे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये हजर आहेत.  १ एसआरपी कंपनी , ४ डीवायएसपी, २० पोलीस निरीक्षक, धडक कृती दल असा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नारायण राणे महाड पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर महाड MIDC पोलीस ठाण्याला येणाऱ्या राणे समर्थकांनी गर्दी देखील केली होती. तर नारायण राणे समर्थकांचा पोलीस स्टेशनबाहेर गोंधळ करत महाड MIDC पोलीस ठाण्याला येणाऱ्या राणे समर्थकांच्या गाडीवर दगडफेक देखील केली.

महाड न्यायालयात सुनावणी सुरू असताना रात्री साडे दहाच्या सुमारास नारायण राणे यांची पत्नी निलम राणे व सून कोर्टात पोहचल्या होत्या.

घटनाक्रम 

  • पहाटे साडेपाच वाजता नाशिक पोलिसांनी राणे यांचे अटकेचे आदेश काढण्यात आले.
  • दुपारी अडीच वाजता राणे यांना रायगड पोलिसांकडून राणे यांना अटक
  • दुपारी तीन वाजता राणे यांचे बीपी शूट झाले.
  • रात्री दहा वाजता महाड कोर्टात सुनावणीला सुरूवात
  • रात्री साडे दहा वाजता महाड कोर्टाच्या आवारात नारायण राणे यांची पत्नी निलम राणे व सून पोहचल्या
  • रात्री आकरा वाजता राणे यांना न्यायालयीन कोठडी व तात्काळ जामीन मंजूर

Leave a Reply

%d bloggers like this: