तिसरी लाट अटळ; मुंबईत आढळले डेल्टाचे १२८ रुग्ण

मुंबई :कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली असली तरी लवकरच तिसरी लाट देशभरात शिरकाव करणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने नेमलेल्या तज्ज्ञ गटाने तर ही तिसरी लाट पुढील सप्टेंबर व ऑक्टोबरपर्यंत अटळ असल्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे मुंबईत जिनोम सिक्वेन्सिंगची पहिली चाचणी पार पडली. त्यात १८८ जणांना डेल्टाची लागण झाल्याचे उघड झाले आहे.

या तज्ज्ञांच्या माहितीनुसार, तिसरी लाट येण्यामागील महत्त्वाचे कारण असे आहे की, लसीकरणाचा वेग कमी असल्याने अजूनही समूहाची प्रतिकारशक्ती तयार झालेली नाही. लसीकरणातून ६७ टक्के लोकांमध्ये सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते पण आता कोरोना विषाणूचे नवे उपप्रकार येत असल्याने ही परिस्थिती अवघड बनली आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात १८८ नमुन्यांची जिनोमिक सिक्वेन्सिंग चाचणी करण्यात आली. त्यात १२८ जण डेल्टाबाधित आढळले आहेत. त्यात अल्फाचे दोन, कप्पा प्रकारचे २४ तर इतर रुग्ण हे सर्वसाधारण कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: