नारायण राणे यांच्या विरोधात पुण्यात शिवसैनिक आक्रमक

पुणे: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल  जे आक्षेपार्ह वक्तव्य केले, त्या निषेधार्थ युवासेना पुणे शहर तर्फे आज गुडलक चौक, डेक्कन येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. तसेच काही लोकांनी आर डेक्कन मॉल वर दगडफेक केली आहे. 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल महाडमध्ये  समाजात द्वेष, तेढ निर्माण होऊ शकतो, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो,  मंत्रालयातील स्वातंत्र्यदिनाचा दाखला देत ‘मी असतो तर कानाखाली लगावली  असती’, असे आक्षेपार्ह वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते.आज युवासेना पुणे शहर तर्फे आंदोलन करण्यात आले .या आक्षेपार्ह विधानाचा युवा सेना पुणे शहर च्या कार्यकत्याकडून व पदाधिकाऱ्या कोंबडी रस्त्यावर सोडून निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनाच्या वेळी युवासेना कडून राणे यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

या आंदोलनाला शिवसेनेचे उपशहरप्रमुख किरण साळी, पर्वती विभाग प्रमुख सुरज लोखंडे ,शहर प्रमुख गजानन  फरकुडे,रमेश गायकवाड ,निरंजन कांबळे,नगरसेवक विशाल धनवडे, बिबवेवाडी विभाग प्रमुख सचिन जोगदंड
व युवा सेना पुणे शहर चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नगरसेवक विशाल धनवडे म्हणाले, शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कुठलाही मोठा नेता असला तरी त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान कुठलाही मोठा नेता असला तरी त्याला शिवसेना जशास तसे उत्तर देऊ.
नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्या बद्दल घाणेरडे विधान करण्याची नारायण राणे यांची ओकात नाही.ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना मोठं केलं आज बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाबद्दल नारायण राणे यांनी विधान केले. म्हणून आज आम्ही आंदोलन करत आहोत.

Leave a Reply

%d bloggers like this: