राणें – दानवे’ प्रभूतींना पुढे करून, भाजपचे ‘गुंडागर्दीचे खालच्या पातळीवर’चे राजकारण -काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी


पुणे : पुणे येथील पत्रकार परीषदेत, नारायण राणे यांनी, “काँग्रेस प्रांताध्यक्ष मा नाना पटोले यांनी मोदींवर टिका केली “तर त्यांना वाजवून टाकेन”…..(?), म्हणाले होते तर खा. संभाजीराजेंना “हे कसले राजे”….? अशी महाराष्ट्राची बदनामी करणारी अश्लाघ्य विधाने सतत केली.. तर दूसरे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवें देखील काँग्रेस नेते राहूल गांधी  वर टीका करत आहेत…! ‘जन आशिर्वाद’ यात्रेतून ‘केंद्राची एक ही चांगली कामगीरी सांगता येत नसल्यामुळेच’, अशी अश्लाघ्य व खालच्या पातळीवरील टीका भाजप नेते राजकीय विरोधकांवर करू लागलेत… व आता मा. मुख्यमंत्री ऊध्वजींना (कानशिलात लावीन …?) असली गुंडागर्दीची अश्लाघ्य व शिवराळ वक्तव्ये करीत मा नाराऱ्यण राणे हे एक प्रकारे ‘महाविकास आधाडी’ प्रमुखांना’ धमकावित आहेत… हे लोकशाही मुल्यांचे खच्चीकरण करण्याचाच भाजप नेत्यांच्या निंद्य प्रयत्नांचा हा भाग असून, या वक्तव्यांचा, धमक्यांचा ‘काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत असून, या नेत्यांवरील कारवाई योग्यच आहे असे काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी जाहीर केलेल्या निवेदनात केलें…!


राज्याचे ११ कोटी जनतेचे प्रमुखपदी, (संविधानात्मक पदावर) असलेल्या मुख्यमंत्री पदी असलेल्या नेतृत्वाचा अवमान व अवहेलना करण्याचा हा निंद्य प्रकार आहे.. हा सहन केला जाणार नाही…! या बाबत वरील सर्व घटनांची कायदेशीर ‘नोंद घेऊन’ योग्य कायदेशीर कारवाई होऊन संविधानात्मक पदांवर असलेल्या नेत्यांचा ऊचीत मान व आदर राखण्याची अपेक्षा ही शिव छत्रपतींच्या व संतांच्या शिकवणूकीची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात आजतागायत संभाळली गेली आहे..! याचे भान देखील सर्वांनाच हवे, त्यामुळे ना नारायण राणें यांची मा मुख्यमंत्री, मा नाना पटोले आदींचे विरोधात धमकीची वक्तव्ये केली त्यावर ऊचीत कायदेशीर कारवाई करणे हे कायद्याचे राज्य असलेल्या ‘महाविकास आधाडी सरकारचे’ कर्तव्यच आहे.. असेही काँग्रेसचे राज्य प्रवक्ता गोपाळ तिवारी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे…!!

Leave a Reply

%d bloggers like this: