Pune – गेल्या 24 तासात कोरोनाचे 205 नवीन रुग्ण तर 250 रुग्णांना डिस्चार्ज
पुणे:पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दोनशे वरआली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या एक हजाराच्या पुढे आली आहे . गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 205नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 250रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 93हजार 786 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 4 लाख 83हजार 005इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 7रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील5 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 2रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8893जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 1888अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 203रुग्ण गंभीर आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 5811 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणेमहापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
