नारायण राणे यांच्या विरोधात महाविकास आघाडी एकवटली

पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीवर येऊन केंद्रीय मंत्री  नारायण राणे अपशब्द वापरले त्याचा निषेध शिवेसना आख्या महाराष्ट्र निषेध व्यक्त करत आहे. आज सकाळी पुण्यात डेक्कन येथे शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले पुण्यातील नारायण राणे यांच्या मॉलची पण शिवसैनिकांकडून कडून तोडफोड करण्यात आली. नंतर संध्याकाळी पुण्यात महाविकास आघाडी ने पण आंदोलन केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात लोकमान्य टिळक पुतळा मंडई येथे आंदोलन करण्यात आले .

या वेळी नारायण राणे यांनी जे अपशब्द वापरले त्याचा महाविकास आघाडी कडून पक्षाच्या कार्यक्रत्या कडून व नेत्यांकडून निषेध करण्यात आला. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादीचे प्रवक्ते  अंकुश काकडे, काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष रमेश बागवे,  अरविंद शिंदे, रवी देशमुख, शिवसेनेचे शहर प्रमुख गजानन  फरकुडे, जिल्हा अध्यक्ष संजय मोरे व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व महानगरपालिकेतील नगरसेवक उपस्थित होते.

महाविकास आघाडी कडून नारायण राणे यांच्या विरुद्ध जोरढार घोषणा देण्यात आल्या. महाविकास आघाडी कडून ररत्यावर कोबंडी सोडून निषेध करण्यात आला.
संजय मोरे म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जे  अपशब्द वापरले त्यांनी राजीनामा द्यावा अशी आमची मागणी या आंदोलनातून आहे.
प्रशांत जगताप म्हणाले, महा विकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नारायण राणे यांनी जे अपशब्द वापरले ते एकदम चुकीचे आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल जनतेला नितांत प्रेम आहे . अशी भाषा वापरणे ही जनतेला मान्य नसून म्हणून आज महाराष्ट्र भर आंदोलनाचा उद्रेक उडाला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: