मालिकेसोबतच प्रेक्षकांना आहे या मालिकेच्या शीर्षक गीताची उत्सुकता

मन झालं बाजिंद या मालिकेचे प्रोमोज रिलीज झाल्यापासून या मालिकेची चर्चा सर्वत्र आहे. बाजिंद या शब्दाचा अर्थ, या मालिकेतील कलाकार या सगळ्यांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता चाहते आणि प्रेक्षकांना आहे. त्याचसोबत अजून एका गोष्टीबद्दल बोलबाला आहे ते म्हणजे या मालिकेच्या प्रोमोमध्ये वाजणार म्युजिक. हे संगीत खूपच श्रवणीय असून ते पुन्हा पुन्हा ऐकण्याची इच्छा होते तसेच ताल धरायला लावणार हे म्युजिक शीर्षक गीतात देखील आहे का हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. त्यामुळे या मालिकेच्या आधी मालिकेच्या शीर्षक गीताची चर्चा सगळीकडे पाहायला मिळतेय.

प्रोमोमधील म्युजिक हे शीर्षक गीतात देखील असणार आहे आणि हे संगीत दिलं आहे ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी. तुझ्यात जीव रंगला, लगीर झालं जी, मिसेस मुख्यमंत्री या मालिकांची लोकप्रिय शीर्षक गीतं सुद्धा ए. व्ही. प्रफुल्लचंद्र या संगीतबद्ध केलं. यानंतर आता मन झालं बाजिंद या मालिकेचं शीर्षक गीत देखील तितकंच लोकप्रिय होईल यात शंका नाही. हि मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

Leave a Reply

%d bloggers like this: