fbpx

राइट स्टेप वैलनेस अँड रिहैब फाउंडेशनच्या वतीने पाच दिवसीय निवासी मोफत व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन

पुणे : कोंडवे धाडवे येथील राइट स्टेप वैलनेस अँड रिहैब फाउंडेशनच्या वतीने व्यसनाच्या आहारी गेलेल्या युवकांसाठी मोफत पाच दिवसीय निवासी व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन दिनांक १ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर 2021 रोजी लक्ष्मी पार्क, 1 मजला, सर्वे नंबर 3/10 कुंजआई नगर, एनडीए रोड, कोंढवे धावडे, पुणे 23 येथे करण्यात आले आहे.

दिवसेंदिवस तरुण पिढी मध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत चालले आहे हीच बाब लक्षात घेऊन पाच दिवसीय निवासी मोफत व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन केले असून या शिबिरामध्ये डॉक्टर, नर्सेस यांचे समुपदेशक मार्गदर्शन होणार आहे. या शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिन अशोक साळवे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये दिली. या पत्रकार परिषदेला डॉक्टर सचिन नगरकर, काउंसलर राहुल दळवी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना साळवे म्हणाले, आजच्या स्पर्धेच्या ताणतणावाच्या काळात देशातील युवा पिढी मोठ्याप्रमाणावर व्यसनाधीन ते कडे वाढत असल्याचे जाणवले. युवा पिढी हीच खरी राष्ट्रशक्ती असल्याने देशाचे नुकसान होते. अत्यावधीमधेच या केंद्राने अनेक तरुणांना व्यसनातून मुक्त करून त्यांचे पुनर्वसन केलेले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: