लावणी नृत्यागंना भगिनींनी बांंधली जय गणेश व्यासपीठ मंडळांच्या कार्यकर्त्यांना राखी

पुणे : रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध आर्य भूषण तमाशा थिएटर मध्ये अनोखे रक्षाबंधन साजरे झाले.
लावणी नृत्यातून उपजिवीका चालविणा-या कलावंत भगिनींसमवेत जय गणेश व्यासपीठाच्या कार्यकर्त्यांनी हा सण साजरा केला .हरवलेली नाती पुन्हा मिळाल्याचा आनंद या भगिनींचा चेहरा औक्षणाच्या तबकातील दिव्याच्या ज्योती सारखा उजळून निघाला.

या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक भेटवस्तू आणि मिठाई याचबरोबर त्यांच्या किमान एका समस्येवर त्यांना मदत करण्याचे वचन सुद्धा ओवाळणीच्या रूपात दिले.या कार्यक्रमास शाहीर हेमंतराजे मावळे व प्रा.संगिता हेमंतराजे मावळे विशेषत्वाने उपस्थित होते. शाहीर हेमंतराजे मावळे यांनी शाहीर पठ्ठे बापूराव यांनी लिहिलेली लावणी गाऊन एक प्रकारे ही स्वरांची ओवाळणी घातली.

या कार्यक्रमाचे आयोजन साईनाथ मंडळाचे पियूश शहा व पोटसूळ्या मंडळाचे कुणाल पवार यांनी केले होते.
तसेच जय गणेश व्यासपीठ मधील राष्ट्रीय साततोटी मंडळाचे स्वप्नील दळवी, श्री शिवाजी मंडळ भवानी पेठ ह्याचे भाऊ थोरात , गोविंदा वरणदानी, अखिल कापडगंज मंडळाचे हरीष खंडेरवाल , विधायक मित्र मंडळ कसबा पेठ अभिषेक मारणे , शिवशक्ती मंडळाचे प्रमोद राऊत , किरण नायकोजी , श्री कालभैरव तरूण मंडळाचे सागर पवार व उमेश सपकाळ , सुंदर गणपती मंडळाचे आकाश शेरे व अनिकेत गवळी , लोकशिक्षण मंडळाचे कमलेश भडसावळे , जयजवान मंडळाचे अमोल सारंगकर , श्रीशिवराज मंडाळाचे सतिश पवार , आदी मंडळे व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आर्यभूषण थिएटर चे मालक राजुशेठ तांबे व व्यस्थपक नंदकुमार लाड ह्यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

%d bloggers like this: