राजीव गांधी जयंती निमित्त काँग्रेस तर्फे बिबवेवाडी मध्ये आरोग्य मोफत तपासणी शिबीर

पुणे: राजीव गांधी जयंती निमित्ताने पर्वती विधानसभा विध्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष केतन जाधव यांच्या तर्फे बिबवेवाडीतील परिसरात आनंदी पॉलिक्लिनिक येथे नागरिकांचे मोफत आरोग्य चेकप शिबिर ठेवण्यात आले .यावेळी  आनंदी पॉलिक्लिनिकचे डॉ.अविनाश गंगावणे, डॉ.नीना गंगावणे, डॉ.अनिता पाटील,  इतर डॉक्टर व पर्वती विधानसभा विध्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी, व कार्यकर्ते उपस्थित होते.

बिबवेवाडी परिसरातील  नागरिकांनि मोफत आरोग्य तपासणी शिबिर चा लाभ घेतला.
केतन जाधव म्हणाले, राजीव गांधी यांच्या जयंती
निमित्त काँग्रेस पक्षाने आघ्या पुणे शहरात आज विविध कार्यक्रम राबवत आहे.आमच्या काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त पुणे शहर काँग्रेस कमिटीने जे कार्यक्रम ठेवले आहेत. त्या कार्यक्रमाला भेटी देत आहेत.
नागरिकांचे मोफत आरोग्य चेकप शिबिर करायचे आम्ही ठरवले. कोरोना या सारखे रोग आज असतील किंवा उद्या नसेल पण आमचा या कार्यक्रमातुन एक उद्देश आहे. प्रत्येक नागरिकांने आपली स्वतःहाची काळजी घेतली पाहिजे.
कोरोना व दुसऱ्या रोगापासून काळजी घेतली पाहिजे.प्रत्येक नागरिकानि स्वतःहा चे चेकप केले पाहिजे. आपल्याला कुठंले आजार आहेत का. म्हणून आम्ही मोफत आरोग्य तपासणी शिबिर ठेवले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: