विद्यार्थ्यांसाठी ‘आयसीएआय’तर्फे शनिवारी मेगा करिअर कौन्सलिंग
‘आयसीएआय’ करिअर कौन्सिलिंग कमिटीचे चेअरमन सीए अनिल भंडारी, व्हाईस चेअरमन सीए प्रसन्न कुमार, ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, पुणे शाखेचे चेअरमन व खजिनदार सीए समीर लड्डा, उपाध्यक्ष व सचिव सीए काशीनाथ पठारे, तज्ज्ञ सीए ऐश्वर्या गुंदेचा यांच्यासह विविध विषयांचे अभ्यासक व तज्ज्ञ या मार्गदर्शन सत्रात करिअर कौन्सलिंग करणार आहेत. विदयार्थी आणि पालकांच्या मनात कोणत्या क्षेत्रात काय संधी आहेत, असा मोठा प्रश्न असतो. त्याचे शंका निरसण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजिला आहे. सीएची भूमिका, सीएचे महत्त्व, सीए नंतर विविध क्षेत्रातील संधी, सीए होण्यासाठीची तयारी कशी करावी, अशा वेगवेगळ्या विषयी माहिती दिली जाणार आहे. राज्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांनी या मेगा करिअर कौन्सलिंगविषयी विद्यार्थ्यांना कळविण्याचे, तसेच विद्यार्थी व पालकांनी या सत्राचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
