पुणे महानगर नियोजन समितीच्या निवडणूकीची अंतिम मतदार यादी 24 ऑगस्टला होणार प्रसिध्द -विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे :- पुणे महानगर नियोजन समितीच्या निवडणूकीची अंतिम मतदार यादी आज दि. 24 ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त,पुणे यांचे कार्यालय तसेच त्यांचे वेबसाईट http://www.divcommpune.in वर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कळविली आहे.

ही अंतिम मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, आयुक्त महानगरपालिका पुणे व पिंपरी चिंचवड कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांचेशी संबंधीत कार्यालय, मुख्याधिकारी लोणावळा, तळेगांव, शिरूर, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, सासवड नगपरिषद कार्यालय जि. पुणे या सर्व कार्यालयांचे सूचना फलकावर दिनांक २४ ऑगस्ट २०२१ रोजी प्रसिध्द करण्यात येत असून सदर महानगर क्षेत्रातील मतदारांना अंतिम मतदार यादया बघण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: