‘वसाहतवादी मानसिकता बदलणे’ या विषयावर २५ रोजी एमआयटी तर्फे राष्ट्रीय ऑनलाइन चर्चा

पुणे : स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानंतर ही देशातील बर्‍याच गोष्टी आज ही वसाहतवादी म्हणजेच इंग्रजांच्या काळातील धोरणाच्या व संस्कृतीनुसार चालत आल्या आहेत. या गुलामगिरी मानसिकतेच्या बेडीतून नव्या पिढीला बाहेर काढणे हा मुख्य उद्देश्य ठेवून एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग) तर्फे ‘वसाहतवादी मानसिकता बदलणे’ (Overcoming the Colonial Mindset) या विषयावर पहिल्या राष्ट्रीय एक दिवसीय ऑनलाईन चर्चा सत्राचे आयोजन करण्यात येत आहे. बुधवार दि.२५ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते ६ या दरम्यान हे चर्चासत्र होईल. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेत डॉ. श्रीपाल सबनीस, पं. वसंतराव गाडगीळ, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. एन.टी.राव, प्र-कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट वरिष्ठ संचालक रविंद्रनाथ पाटील, सहयोगी संचालिका डॉ. शैलश्री हरिदास व प्रा. परिमल सुधाकर हे उपस्थित होते.

वसाहतवादी मानसिकता (Colonial Mindset) म्हणजे वांशिक किंवा सांस्कृतिक कनिष्ठतेची आंतरिक वृत्ती बदलणे आहे. याच संदर्भातील काही विचारधारेच्या पोस्टर्सचे प्रदर्शन डब्ल्यूपीयूच्या कॅम्पसमध्ये भरविण्यात आले आहे. याच दिवशी प्रदर्शनाचे उद्घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सकाळी ९.३० वा. करणार आहेत. या वेळी सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. संजय नहार हे उपस्थित रहाणार आहेत.

या ऑनलाईन चर्चासत्रात खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी, खासदार डॉ. राकेश सिन्हा, माजी निवडणुक आयुक्त एन.गोपालास्वामी, सुप्रसिद्ध विधिज्ञ डॉ. ललित भसीन, राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष डॉ. पोर्णिमा अडवाणी, सिने मोहन जोशी, मानवी हक्क कायदेतज्ञ अ‍ॅड. ऋतुपर्णा मोहंती, विवेक वेलणकर, डॉ. कुमार प्रशांत, खासदार प्रयागासिंग ठाकूर, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार डॉ. सुधांशू त्रिवेदी आणि पाकिस्तान येथील नजीम शेठी हे या विषयावर आपले विचार मांडतील.

Leave a Reply

%d bloggers like this: