सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या “स्वच्छ वारी निर्मल वारी 2019” या कार्यक्रमातील गैरव्यवहाराची होणार सहसंचालक डॉ.संजय जगताप यांच्या मार्फत चौकशी

पुणे : “स्वच्छ वारी निर्मल वारी 2019” या कार्यक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली होती. तत्कालीन मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम 30 जुन 2019 रोजी पार पडला होता. या उपक्रमात 69 लाख रुपयांची तरतुद विद्यापीठाने केली होती.

या उपक्रमातील खर्चाच्या तपशिलाबाबत आरटीआय मधून दोन वेळा माहिती मागवली होती. मात्र, विद्यापीठाकडून पहिल्या माहिती अर्जास दिलेल्या खर्चाच्या रकमेत व दुसऱ्यांदा दिलेल्या माहितीत प्रचंड तफावत आढळली ! पहिल्या अर्जातून खर्च तपशील सुरवातीला 53 लाख व दुसऱ्या अर्जातून 35 लाख देण्यात आला म्हणजे सरळसरळ फसवी माहिती विद्यापीठाने दिल्याचे स्पष्ट होतेय.

या उपक्रमास प्रायोजकाकडुन 2 कोटी 71 लाख रु.मिळाले होते. यासंदर्भातील तपशील अद्यापही विद्यापीठाने दिला नव्हता.

या संदर्भात वेळोवेळी माहीती विचारली होती. कोणत्या व्यक्तीने व कोणत्या संस्थेने एवढी रक्कम दिली व त्याचे स्वरुप काय आहे. मात्र, हि माहिती देण्याचे विद्यापीठाने जाणीवपूर्वक टाळून सदर माहिती गुलदस्त्यात ठेवली आहे.

या प्रकरणाचा मी गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करत होतो. याबाबत चौकशीसाठी नुकतीच सहसंचाल यांच्या माध्यमातून समिती जाहिर झाली आहे व येत्या 15 दिवसात अहवाल संचालकास सादर करणे विद्यापीठास बंधनकारक आहे.

त्यामुळे या चौकशीतून झालेला गैरव्यवहार व विद्यापीठाने लपवलेली माहिती समोर येणार असून विदयापीठाच्या या गैरव्यवहारात कोणते बडे मासे अडकतात हे लवकरच स्पष्ट होईल.

Leave a Reply

%d bloggers like this: