मी प्रबोधनकार आणि यशवंतरावही वाचलेत राज ठाकरेंचे शरद पवारांना प्रत्युत्तर
पुणे : मी प्रबोधनकार ठाकरे वाचलेत आणि यशवंतराव चव्हाण पण वाचले आहेत. मी जे बोललो ह्याचा प्रबोधनकार ठाकरे माझ्या आजोबांनी लिहिलेल्या पुस्तकांचा काय संबंध होता हे शरद पवार यांनी समजावून सांगावं, आपण अजूनही जातीपातीमध्ये खितपत पडलो आहोत. जातीपातींच्या बाबत चर्चा करतो आहोत. निवडणूकीत सगळ्यांची भाषण होतात तेव्हा ७४ वर्षांपासून आपण तेच सांगतो की, आम्ही तुम्हाला रस्ते देऊ, वीज देऊ,पाणी देऊ जर आपण एवढी वर्ष हेच सांगणार आहोत तर आपण काय कमावलं आणि काय गमावलं हे आपल्याला शोधणं गरजेचे आहे. अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांना आज प्रत्युत्तर दिले.
पुण्यात आयोजित पत्रकार परिसहदेत राज ठाकरे बोलत होते. राज्य ठाकरे म्हणाले, शतकानुशतके जात आपल्या महाराष्ट्रासह देशात आहे. जगातही असू शकतील. पण साधारणपणे ९९ साल जर आपण पाहिले तर ९९ सालाच्या आधी जातीपाती होत्या परंतू त्यानंतर ९९ नंतर जातीपातीमध्ये एकमेकांच्या बद्दल द्वेष वाढला हे माझं वक्तव्य आहे. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जाती जातींमध्ये जास्त निर्माण झाला. याच्या अगोदर प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान होता. जातीवर राजकारण होत होते. मात्र दुसऱ्या जातीबाबत द्वेष हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर झाला असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. सर्व राजकीय पक्षांना माहिती आहे फक्त बोललो फक्त मी, या सगळ्या संदर्भामध्ये राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरे वाचावे याचा अर्थच कळला नाही. प्रबोधनकार ठाकरे मी वाचलेत. त्यांची सगळी पुस्तके वाचली आहेत. त्यांचे संदर्भ त्या त्या काळातले होते. आपल्याला पाहिजे तेवढं प्रबोधन ठाकरेंचं घ्यायचे आणि बाकीचं घ्यायचं नाही असं चालणार नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
