Sunday, September 27, 2026
Latest NewsNATIONALPUNETOP NEWS

Pune – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर ‘बंद’, जाणून घ्या का हटवला मोदींचा पुतळा

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे औंध येथे मंदिर उभारण्यात येऊन त्याचे स्वातंत्र्य दिनी लोकार्पण करण्यात आले होते. या बाबत पंतप्रधान कार्यालयातून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज येथे इंधन महागाई विरोधात आंदोलन करण्यात येणार होते. यामुळे भाजप पदाधिकार्‍यांनी तातडीने हालचाल करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या मंदिरातील पुतळा येथील भाजपच्या नगरसेवकाच्या कार्यालयात हलविण्यात आला आहे.

एका कार्यकर्त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी होत असल्याने हे मंदिर बंद करण्यात आल्याचे पदाधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. भाजपचे कार्यकर्ते मयुर मुंडे यांनी औंध गाव येथे नगरसेविका अर्चना मुसळे यांच्या कार्यालयाजवळ 15 ऑगस्ट रोजी या मंदिराचा लोकार्पण सोहळा झाला होता. देशातील नरेंद्र मोदी यांचे हे पहिलेच मंदिर असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यासाठी १ लाख ६० हजार रुपये खर्च करुन खास जयपूर येथून मोदी यांचा मार्बलचा पुतळा तयार करुन घेण्यात आला होता. हे मंदिर उभारल्याची चर्चा संपूर्ण देशात पसरली. पंतप्रधान कार्यालयाने याची गंभीर दखल घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर

दिल्लीतून थेट शहर भाजपा पदाधिकायांची कानउघडणी करण्यात आली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पदाधिकार्‍यांना सुचना केल्या. त्यानंतर शहर भाजपा पदाधिकार्‍यांची धावपळ उडाली. मंदिर बांधणारे भाजपाचे कार्यकर्ते मयुर मुंडे यांना मंदिर हटविण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर त्यांनी स्वत: मोदी यांचा पुतळा काढून जवळच असलेल्या नगरसेविकेच्या कार्यालयात हलविला. त्यानंतर मंदिर पडदा टाकून बंद केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading