Sunday, September 27, 2026
Latest NewsPUNE

कोरोनाच्या संकटात सामाजिक भान राखून काम करणाऱ्या कोरोना योद्द्यांना ‘राष्ट्रसेवक पुरस्कार’ देऊन केले सन्मानित 

पुणे : गेल्या दिड वर्षात कोरोना संकटाला तोंड देत आपल्या देशाने अविस्मरणीय कामगिरी केली आहे. प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने यामध्ये भाग घेतला आहे. यातच कोरोना योद्द्यांनी विशेष काम केले आहे. त्यामध्ये डॉक्टर्स, नर्सेस, शिक्षक,आरोग्य कर्मचारी या सर्वांनी दिलेल्या योगदानामुळे लाखो प्राण वाचवण्यास मदत झाली त्यांचे कौतुक देशाचे स्वातंत्र्य दिनाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना होत आहे.ही आनंदाची बाब आहे. आज शहरातीलच नव्हे तर राज्यातील,देशातील,जगातील डॉक्टरांनी,कोरोना योद्द्यांनी जी सिमपती दाखवली जी सेवा केली स्वतःचे प्राण धोक्यात घातले त्यांच्या बद्दल कृतज्ञता करण्याचा हा क्षण आहे. त्यांचा सत्कार होत आहे त्याचा मला विशेष आनंद होत आहे. असे मत माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केले.

15 ऑगस्ट अमृत महोत्सवाचा प्रारंभ आज राजीव गांधी ई लर्निंगमध्ये साजरा झाला अध्यक्षस्थानी उल्हास पवार होते. तसेच याप्रसंगी उद्योजक धनंजय बदामीकर,दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण इंदलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रारंभी या कार्यक्रमाचे आयोजक व पुणे महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी सर्वांचे स्वागत केले ते म्हणाले की, देश आणि समाज संकटात असताना धावून जाणं ही वृत्ती डॉक्टर, शिक्षक ,आरोग्य सेवक व विविध नागरिकांमध्ये दिसून आली ही विशेष कौतुकाची बाब आहे.त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देने ही आता समाजाची जबाबदारी आहे. त्यासाठीच हा विशेष कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला आहे. यावेळी 75 डॉक्टर, शिक्षक,आरोग्य सेवक व कोरोनाकाळात विशेष काम करणाऱ्या नागरिकांचा  राष्ट्रसेवक म्हणून गौरव करण्यात आला. 
या प्रसंगी प्रवीण वाळिंबे यांच्या गाथा शौर्य पथकांची- परमवीर चक्र या पुस्तकाचे प्रकाशन जेष्ठ गांधीवादी व विचारवंत उल्हास पवार यांच्या हस्ते करण्यात आले. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम सावंत यांनी केले व आभार प्रदर्शन पुणे शहर काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अमित बागूल यांनी केले.यावेळी सागर आरोळे,अशोक शिंदे,सुरेश गायकवाड,समीर शिंदे,इम्तियाज तांबोळी,धनंजय कांबळे,सौरभ ढेबे, सुरज सोनवणे,विजय सकट, विकास मनोरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading