तालिबान्यांची तुलना थेट महर्षी वाल्मिकींशी; शायर मुन्रवर राणा यांच्या वक्तव्यामुळे नवीन वाद
मुंबई : तालिबान्यांनी काबूलवर कब्जा केल्या नंतर संगळीकडूनच त्यांच्या दहशतवादा विषयी भीती व्यक्त होत आहे. आशा वेळी तालिबान्यांची तुलना महर्षी वाल्मिकींशी करून प्रसिद्ध शायर मुन्नवर राणा हे चर्चेत आले आहेत. एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. इतकेच नव्हे तर ‘तालिबान्यांनी २० वर्ष अन्याय सहन केला आहे. यामुळे सत्तेत आल्यावर त्यांना आनंद होणारच’, असे विधानही राणा यांनी केले आहे. यामुळे पुन्हा नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
‘न्यूज नेशन’या वृत्त वाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलताना राणा यांनी तालिबान्यांची तुलना महर्षि वाल्मिकीशी केली आहे. राणा म्हणाले, ‘आतापर्यंत तालिबानी आतंगवादी आहेत. वाल्मिकी रामायण लिहून देवत्व मिळवतात, त्या आधी ते ही डाकू होते. माणसाचे स्वभाव बदलत राहतात. गेली २० वर्षांपासून तालिबानी भटकत आहेत. अमेरिकेचा अन्याय त्यांनी सहन केला आहे. त्यांची अनेक माणसे गेली आहेत. त्यामुळे हातात सत्ता येताच त्यांनी आनंद साजरा करणं स्वाभाविक आहे. त्याचा कोणाला त्रास होण्याची गरज नाही. असेही राणा यांनी म्हटले आहे.
मुन्नवर राणा म्हणाले की, तालिबानने त्यांचे दोन मोठे शत्रू अमेरिका आणि रशिया यांच्याशी प्रदीर्घ युद्ध लढले, त्यामुळे त्यांनी किती अत्याचार केले असतील याचा विचार केला पाहिजे. याचाही हिशेब ठेवला पाहिजे असे ते म्हणाले. तालिबानकडून होत असलेल्या अत्याचाराबद्दल आम्हाला काळजी करण्याची गरज नाही. भारताचे हजारो वर्षांपासून अफगाणिस्तानशी चांगले संबंध आहेत.
