टीसीएस आयटी विझ – २०२१ सुरु होत आहे, नोंदणी ३० सप्टेंबरपर्यंत करा
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या टीसीएस आयटी विझचे हे २३वे वर्ष आहे. भारतातील सर्वात मोठी आंतरशालेय क्वीझिंग स्पर्धा टीसीएस आयटी विझ भारतातील आंतरशालेय क्वीझिंग सर्किटमध्ये एक राष्ट्रीय मानदंड बनली आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेने डिजिटल मोड स्वीकारला आणि आता २३व्या वर्षात टीसीएसचा हा ज्ञान उपक्रम निश्चितपणे अधिक जास्त रोचक बनेल व संपूर्ण देशभरातून स्पर्धक यामध्ये सहभागी होतील.
टीसीएस आयटी विझची सुरुवात १९९९ साली झाली. देशातील विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाकडे एका नव्या दृष्टिकोनातून पाहावे यासाठी त्यांना सक्षम करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. ही क्विझ विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानाच्या सीमा रुंदावण्यासाठी आणि पाठ्यपुस्तकांच्या बाहेर पडून सत्याचा शोध घेण्यासाठी प्रोत्साहित करते. आज टीसीएस आयटी विझ भारतातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक काळापासून सुरु असलेली आंतर-शालेय आयटी क्विझ आहे.
टीसीएस आयटी विझमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना https://www.tcs.com/itwiz/register-here या लिंकवर ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणी करता येईल. या क्विझच्या फॉरमॅटनुसार या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारण्यात येत नाही. नोंदणीनंतर क्विझ सुरु होण्यासाठी दोन स्वतंत्र प्राथमिक फेऱ्या होतील.
या प्राथमिक फेऱ्या टीसीएस आयओएन प्लॅटफॉर्मवर आयोजित केल्या जातील आणि त्यानंतर उपांत्यपूर्व फेऱ्या होतील. या टप्प्यावर स्पर्धेमध्ये ९६ विद्यार्थी असतील जे पहिल्या ६ मध्ये स्थान मिळवण्यासाठी उपांत्य फेरीत जातील. या सर्व फेऱ्यांमध्ये विजय मिळवत पहिल्या ६ स्थानांपर्यंत पोहोचलेल्या स्पर्धकांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील अंतिम फेरी होईल. टीसीएस आयटी विझच्या २३व्या आवृत्तीच्या विजेत्याला/विजेतीला देशाचा/ देशाची आयटी विझार्ड म्हणून नावाजले जाईल, तसेच विजेत्याला विजेतीला ट्रॉफी, सुवर्ण पदक, विजेता प्रमाणपत्र आणि आकर्षक गिफ्ट व्हाउचर्स देऊन सन्मानित केले जाईल.
