बँक ऑफ इंडियातर्फे ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा
पुणे : ‘आझादी का अम्रित महोत्सव’ या सध्या सुरू असलेल्या स्वातंत्र्य महोत्सवादरम्यान बँक ऑफ इंडियाने ७५ वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला. १५ ऑगस्ट २०२१ रोजी बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयात – द स्टार हाउस येथे पारंपरिक जल्लोष व उत्साहात आणि कोविडचे सर्व नियम पाळून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ए. के. दास यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवत स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाला सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यकारी संचालक श्री. पी. आर. राजागोपाल, श्रई. स्वरूप दासगुप्ता, श्री. एम. कार्तिकेयन आणि श्रीमती मोनिका कालिया, सीव्हीओ श्री. एल. एन. रथ तसेच मुख्य कार्यालायतील सर्व व्यवस्थापक आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ए. के. दास यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित केले. याप्रसंगी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तिरंग्याच्या रंगाचे फुगेही आकाशात सोडले.
त्यानंतर बँकेच्या सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्यांची नावे तसेच कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी डिजिटल पातळीवरून घेण्यात आलेल्या स्पर्धेच्या विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली आहे. मुख्य कार्यालयातील सुरक्षा समूहाचा यावेळेस सत्कार करण्यात आला. पर्यावरणाविषयी जागरूका पसरवण्यासाठी बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने यावेळी वृक्षारोपणही केले.
बँकेने तयार केलेल्या दोन शॉर्ट फिल्म्सचेही यावेळेस व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. पहिल्या फिल्ममध्ये महामारीदरम्यान कर्तव्य निभावताना आपला जीव गमावलेल्या सर्व शूर कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे, तर दुसऱ्या फिल्ममध्ये गेल्या ११५ वर्षांतील बँकेचा दैदीप्यमान प्रवास आणि राष्ट्रउभारणीसाठी दिलेले योगदान यांचा आढावा मांडण्यात आला आहे. स्वदेशी चळवळ जोरात असताना ७ सप्टेंबर १९०६ रोजी बँकेची स्थापना करण्यात आली होती. सध्या सुरू असलेल्या स्वातंत्र्य महोत्सवादरम्यान ‘आझादी का अम्रित महोत्सव’ या पुस्तकाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
