Sunday, September 27, 2026
Latest NewsPUNE

देवराईच्या धर्तीवर बाणेर टेकडीवर फुलणार ‘रोटराई’ !

पुणे : सह्याद्री डोंगररांगांमध्ये जुने वृक्ष सांभाळून ठेवणाऱ्या देवराई या संकल्पनेकडून प्रेरणा घेत पुण्यात बाणेर टेकडीवर रोटरी क्लब ऑफ पुना नॉर्थतर्फे संलग्न रोटरी क्लब आणि वसुंधरा अभियान या स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ‘रोटराई’ हा पर्यावरण संवर्धन प्रकल्प सुरू करण्यात येत आहे.रविवारी 22 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता या प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात येत आहे.

रोटरी क्लबचे प्रांतपाल पंकज शहा,रोटरीच्या पर्यावरण विभागाचे अध्यक्ष समीर रूपानी,रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थच्या अध्यक्ष मनीषा कोनकर,रोटरी क्लब ऑफ स्पोर्ट सिटीच्या अध्यक्षा किरण राव,रोटरी क्लब ऑफ वारजेचे अध्यक्ष हेमंत जोशी,तसेच वसुंधरा अभियान या स्वयंसेवी संस्थेचे विश्वस्त पांडुरंग भुजबळ हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थच्या अध्यक्ष मनीषा कोनकर यांनी पत्रकाद्वारे या प्रकल्पाची माहिती दिली.या पर्यावरण संवर्धन आणि जैववैविध्य राखणाऱ्या प्रकल्पामध्ये सह्याद्री डोंगर रांगांमध्ये येणारी स्थानिक प्रजातींची झाडे लावण्यात येणार आहेत.पाच हजार झाडे लावून ती जगवण्याची जबाबदारी घेण्यात आली आहे.या प्रकल्पासाठी सहा फूट उंच रोपे,सेंद्रिय खत,सुरक्षा सामग्री,पाणी पुरवठा,पर्यावरण पूरक सामग्री पुरवण्यात आली आहे,असे मोहन पुजारी आणि गिरीश कोनकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading