Sunday, September 27, 2026
Latest NewsPUNE

पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्या

पुणे : थोरले बाजीराव पेशवे यांच्यासारख्या देदिप्यमान व्यक्तीचे नाव पुणे रेल्वे स्थानकाला द्यावे. तसेच श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचे नाव नव्याने होणा-या मेट्रो स्थानकाला द्यावे. शनिवारवाडयाच्या मोठया प्रमाणात दुरावस्था झाली असून त्याचा जीर्णोद्धार करणे गरजेचे आहे. त्याकरीता राज्य व केंद्र सरकारने निधी द्यावा. तसेच शनिवारवाडा परिसरातील प्रलंबित कामे ३-४ महिन्यांत पूर्ण करावी, अशी मागणी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांसह बाजीराव पेशवे यांच्या वारसदारांनी केली आहे.

 थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२१ व्या जयंतीनिमित्त शनिवारवाड्यावरील त्यांच्या पुतळ््याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनिता वाडेकर, शिक्षण मंडळ अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर,नगरसेवक जयंत भावे, संदीप खर्डेकर,  संस्थेचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, पेशव्याचे वंशज श्रीमंत उदयसिंहजी पेशवा आणि कुटुंबिय, संस्थेचे उपाध्यक्ष अनिल गानू, सचिव कुंदनकुमार साठे, उदय गांगल, श्रीकांत नगरकर, उमेश देशमुख उपस्थित होते.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, थोरले बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याकरीता पुतळ्यापर्यंत जाता येत नाही, ही शोकांतिका आहे. अनेकदा मागणी करुनही येथे पुतळ्यापर्यंत जाण्याकरीता जिना उभारण्यात आलेला नाही. महापालिकेने याकडे लक्ष देऊन त्वरीत जिना उभारावा. तसेच शनिवारवाडयाच्या अंतर्गत सुधारणेकरीता केंद्र सरकार, पुरातत्व विभाग आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भूषण गोखले म्हणाले, पेशव्यांची जयंती व पुण्यतिथी शनिवारवाडयासह शहराच्या इतर भागांमध्ये देखील साजरी व्हावी, याकरीता प्रयत्न करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रासह देशभरात पेशव्यांचे कार्य पोहोचावे, यादृष्टीने उपक्रम राबविण्यात येणार असून तरुणाई देखील याकरीता सहभागी होणार आहे.
मोहन शेटे म्हणाले, थोरले बाजीराव पेशवे हे ४८ पेक्षा जास्त लढाई जिंकलेले जगातील एकमेव सेनापती होते. उत्तर हिंदुस्थानात दरारा निर्माण करणारे ते योद्धे होते. त्याकाळी मराठयांनी पानिपतमध्ये रक्त सांडले म्हणून आजचा हिंदुस्थान आपल्याला पहायला मिळत आहे. आपला हा पराक्रमाचा इतिहास आचरणात आणण्याची गरज आहे. शनिवारवाडा हा आपल्या पराक्रमाची स्फूर्ती देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading