Thursday, November 19, 2026
Latest NewsLIFESTYLEMAHARASHTRA

पुण्याचं सुप्रसिद्ध ‘शौकीन’ मुंबईकरांच्या सेवेत दादरमध्ये!

‘कळीदार कपूरी पान कोवळं छान केशरी चुना… ‘ हे गाणं ऐकताच डोळ्यासमोर येतो मस्तपैकी तयार केलेला पानाचा विडा. विड्याच्या पानाचं भारताच्या इतिहासाशी आणि परंपरांशी खूप जुनं नात आहे. आजही भारताच्या प्रत्येक गल्लीत, चौकात किंवा मुख्य भागांमध्ये पानपट्टी हमखास दिसतेच. यावरून हेच कळतं की, विड्याचं पान हे फक्त भारतातल्या नवाब किंवा राजाचंच नाहीतर सामान्य शौकिनांचंही आवडतं आहे. जेवण झाल्यावर तोंडाची चव कायम ठेवण्यासाठी राजा-महाराजांच्या काळापासून अगदी आत्तापर्यंत सामान्य ‘शौकीन’ तरुणाईसुद्धा आजही पान खाणं मस्ट म्हणते.

अल्पावधीतच राज्यात लोकप्रिय झालेला ‘शौकीन’ हा ब्रँड आता खास मुंबईकरांसाठी दादर पश्चिमेच्या रानडे रोड परिसरात सुरु झाला आहे. दादरच्या ‘शौकीन’चे उदघाटन  शर्मिला राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मनसेच्या रिटा गुप्ता, निर्माते – दिग्दर्शक – अभिनेते अजित भुरे, अभिनेत्री सविता मालपेकर, अभिनेते संजय मोने,  विनय येडेकर, अतुल परचुरे, सखी परचुरे, अजीत रमेश तेंडुलकर, बीवायपीचे श्रीराम पाध्ये, दिग्दर्शक अजय फणसेकर, धनंजय केतकर, अश्विन शहा उपस्थित होते. पुण्यामधील शरद मोरे या ‘शौकीन’ अवलियाने २००५ साली अस्सल चवीच्या आपल्या पुणेकरांसाठी पाहिलं ‘कम्प्लीट पान शॉप’ सुरु केले.

‘शौकीन’ स्पेशलमध्ये चॉकलेट मघई मसाला, व्हॅनिला चॉकलेट, पिस्ता चॉकलेट, स्ट्रॉबेरी चॉकलेट, मँगो चॉकलेट, केशर पिस्ता चॉकलेट, रोस्टेड अल्मन्ड चॉकलेट, ब्लॅक करंट चॉकलेट, साधा पान मध्ये कलकत्ता साधा, कलकत्ता स्पेशल साधा, रामप्यारी( कलकत्ता), मघई साधा, मघई स्पेशल साधा, शौकीन स्पेशल ड्रायफ्रूट मसाला मावा, शौकीन स्पेशल मसाला ( स्पेशल मसाला + ड्रायफ्रूट + ५ प्रकारची चटणी), मसाला (मीठा) मध्ये  कलकत्ता मसाला, मघई मसाला (जोडी ), बनारस मसाला, कलकत्ता मसालामध्ये ड्रायफ्रूट, केशर, मघई मसालामध्ये चॉकलेट, ड्रायफ्रूट, केशर तसेच आईस पान, फायर पान, पुणेरी पान अश्या विविध प्रकारच्या चवींची लज्जत मुंबईकरांना चाखता येणार आहे.

लहानग्यांसाठी मेन्यू कार्डमध्ये बदल

खास लहान मुलांसाठी त्यांना आवडणाऱ्या टेस्टची पाने विकसित केली आहेत. ‘व्हॅनिला चॉकलेट पान’, ‘स्ट्रॉबेरी चॉकलेट’, ‘ड्रायफूट पान’ , ‘चॉकलेट मगई’, ‘ऑरेंज चॉकलेट’ अशी लहानग्यांना आवडणाऱ्या फ्लेवर्सची रेंज आमच्याकडे असणार आहे. इतकंच काय, ‘बर्थ डे सेलिब्रेशन पान’ आणि चक्क ‘फॅमिली पॅक’ही उपलब्ध आहेत.

 

Leave a Reply