Wednesday, November 18, 2026
Latest NewsMAHARASHTRA

परभणी – शहरात सुरु होणार विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाई


परभणी : कोरोनाच्या  तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता महापालिकेने पुन्हा एकदा कडक कारवाईला सुरुवात केली आहे, परभणी शहरामध्ये विना मास्क फिरणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई होणार असून त्यासाठी महापालिकेने आठ ठिकाणी स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
शहरात विना मास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे.तसेच तिसऱ्या लाटेचा धोका देखील आहे.त्यामुळे महापालीका प्रशासनाने  प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाई सुरु करण्याचा निर्णय गेतला आहे.त्यासाठी आपणा कॉर्नर, विसावा कॉर्नर, जाम नाका, गंगाखेड नाका, शिवाजी चौक, वसंतराव नाईक पुतळा, नागोबा कॉर्नर, गुलशनाबाग, काळीकमान अशा ठिकाणी स्वच्छता निरीक्षकांची नेमणूक केली असून याठिकाणी पोलिसांच्या मदतीने विना मास्क करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे याबाबत महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी आदेश काढले.

Leave a Reply