पाचव्या दिवशीही ग्रंथापालांच्या उपोशानाकडे शासनाचा काना डोळा
डॉ. बाबा आढाव यांची आंदोलनस्थळी भेट
पुणे : १२ ऑगस्ट हा देशात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन पासून पुणे सह कोल्हापूर व नागपूर येथे महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघ व आरोग्य विज्ञान महाविद्यालयीन ग्रंथालय व क्रिडा शिक्षक संघ च्या वतीने बेमुदत साखळी उपोषणास सुरु आहे. पाच दिवस झाले तरी अद्याप ग्रंथपालांच्या आंदोलनाची शासनाने दखल देखील घेतली नाही.
अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील ग्रंथपाल पदांची भरती ही प्राचार्य पदाच्या भरतीच्या धरतीवर सुरु करणे व ४ मे २०२० रोजी पदभरती वर निर्बंध लादण्या अगोदर ज्या महाविद्यालयांना शासन नियमानुसार पदभरतीची परवानगी (एनओसी) मिळाली आहे अशा महाविद्यालयांना तेथील पदाच्या मुलाखतीसाठी तातडीने परवानगी द्यावी. तसेच खासगी विनानुदानित संस्थेमधील ग्रंथपालांना समान काम समान वेतन हे धोरण ठेवून विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्धारित केलेली वेतनश्रेणी नुसार वेतन मिळाले या मुख्य मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण आंदोलन सुरु आहे.
सोमवारी ता. १६ जेष्ठ जमाजवादी विचारवंत तथा हमाल पंचायत चे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघच्या सुरु असलेल्या आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांच्या मागण्या समजून घेत त्याबर सविस्तर चर्चा केली. तसेच ग्रंथपालांचे सुरु असलेले आंदोलन हे न्याय मागण्यासाठी असल्याने शासनाने याची त्वरित दखल घेऊन यावर शासन निर्णय काढावा. तसेच जर वेळ आली तर मी स्वतः ग्रंथपालांच्या आंदोलनात सहभाग घेईन. तरी शासनाने वरिष्ठ महाविद्यालयातील ग्रंथपालांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावेत.
यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भताने, दिलीप भिकुले, प्रा. संदीप चोपडे, डॉ. प्रवीण पंडित, संतोष केंगले, सरिता स्थूल, समीर मोरे, नवनाथ शिंदे सह आदी उपस्थित होते.
