ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविरुद्ध देश बचाव जन आंदोलन समितीचा आंदोलनाचा इशारा
पुणे: सध्या देश अत्यंत भयानकतेकडे वाटचाल करीत आहे.अविचारी नोटबंदी नंतर झालेली आथिक हानी कोरोना, लॉकडाऊन, वाढती महागाई, बेरोजगारी यामुळे संपूर्ण देशातील सर्व सामान्य जनता भरडली जात आहे. त्यातच आता कृषी कायदे करून केंद्र सरकार शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. देशात एवढे सगळे होत असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मात्र गप्प आहेत भ्रष्टाचारातून देश बाहेर काढण्यासाठी आमच्यापैकी काहीजण अण्णांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत मात्र आता देश अडचणीत असताना अण्णा चकार शब्द काढत नाही त्यामुळे पुढील 15 दिवसात अण्णांनी देशाच्या सध्याच्या परिस्थितीवर आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर आम्ही राळेगणसिद्धीत येथे जाऊन अण्णा आणि केंद्र सरकार विरुद्ध बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत देश बचाव जन आंदोलन समितीचे प्रमुख ऍड रवींद्र रणसिंग यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला विकास देशपांडे, मुकदं काकडे, अभय भोर, दुर्गा भोर उपस्थित होते.
रवींद्र रण सिंग म्हणाले, केंद्र सरकारचे तीन कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी अत्यंत जाचक आहेत. यामध्ये पहिला कायदा कृषी पणनबाबत आहे. ज्यामुळ पणनच्या मार्केट कमिटी या बंद होतील. दुसऱ्या कृषी कायद्यामुळे एसेनिशयल कमोडिटी एक मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे .जुन्या कायद्यात अत्यावश्यक वस्तूंच्या किती साठा करावा यासाठी शासनाने मर्यादा घालून दिली होती आता मात्र अशी कोणतीही मर्यादा ठेवण्यात आली नाही त्यामुळे मोठे भांडवलदार उद्योगपती जीवनावश्यक वस्तुंचा अमर्यादित साठा करून टाकणार आहे यामुळे नफेखोरी वृत्ती उदयास येणार आहे. तिसरा कृषी कायदा कॉन्टॅक्ट फार्मिंग आहे.
नोटाबंदी, बीएससी अशा निर्णयांमुळे देशाचे अर्थकारण मंदावले आहे .महसूल वाढीसाठी सरकार डिझेल पेट्रोल वरील कर वाढवत आहे. किंवा फायदा उचलत सरकारी कंपनी विकून महसूल गोळा करीत आहे कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही आपल्याला पेट्रोल-डिझेल चढ्या भावाने विकत घ्यावे लागत आहे .त्यामुळे सर्व क्षेत्रात वाढलेल्या महागाईने आपले कंबरडे मोडले आहे. अशावेळी शेतीचे यंत्र व शेतकऱ्यांना संकटात टाकणारे केंद्र सरकारने कृषी कायदे आणले आहेत. यावर देश बचाव जनांदोलन समिती आवाज उठवणार आहे .यामध्ये अण्णा सोबत आले तर त्यांनी नेतृत्व करावे. अन्यथा देश बचाव जन आंदोलन समिती स्वतंत्र लढा देणार आहे.
