Thursday, November 19, 2026
Latest NewsPUNE

स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पर्वतीमध्ये आकर्षक विंटेज कार रॅली 

पुणे : ७५ मीटर उंचीचा प्रचंड मोठा झेंडा फडकणारा तिरंगा, जुन्या काळाची आठवण करून देणाऱ्या विंटेज कार्स व त्यामध्ये राष्ट्रीय नेत्यांची   ड्रेपरी करून बसलेली लहान मुले मागे  गळ्यात तिरंगी मफलर घालून सहभागी झालेले सुमारे ५० नागरिक भारत माता की जय, वंदे मातरम अश्या घोषणा आणि अतिशय शिस्तबद्ध रीतीने निघालेली ही शोभा यात्रा सर्वांचे आकर्षण बनले होते. निमित्त होते १५ ऑगस्ट आपल्या देशाचे स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत असल्याने काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांच्या पुढाकाराने या अभिनव शोभा यात्रेचे आयोजन या दिनानिमित्त करण्यात आले होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष सुरुवात होत असताना स्वतंत्र पूर्व काळातील आठवण या विंटेज कारमुळे झाली आणि आपले राष्ट्रीय नेत्यांची ड्रेपरी या लहान मुलांनी केली त्याचे कौतुक व असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांचे कौतुक सर्वानी केले.
या मिरवणुकीत असणाऱ्या विंटेज कारमध्ये  भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज,राष्ट्रमाता जिजाऊ, महात्मा गांधी, महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,लोकमान्य टिळक,सुभाषचंद्र बोस,डॉ बाबासाहेब आंबेडकर, मंगल पांडे, इंदिरा गांधी, सुखदेव व देशाचे रक्षण करणारे भारतीय जवान  त्या त्या राष्ट्रीय नेत्यांची ड्रेपरी करून लहान मुले बसले होते. त्यांच्या हातात तिरंगी झेंडे होते. पुढे अनाऊन्समेंट करत चाललेल्या या शोभा यात्रेतदुतर्फा जमलेल्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे चौक चौकात कागदी फुलांचा वर्षाव करण्यात आला.
या वेळी पुणे शहर काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अमित बागुल, उद्योजक धनंजय बदामीकर,नंदकुमार बानगुडे,घनशाम सावंत, सागर आरोळे,इम्तियाज तांबोळी, धनंजय कांबळे,बाबासाहेब पोळके, अभिषेक बागुल, राम रणपिसे आदी उपस्थित होते.

Leave a Reply