Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

पानशेत मधून विसर्ग बंद धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती

पुणे: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात 29 टीएमसी म्हणजे 90 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे दरम्यान खडकवासला, पानशेत ,वरसगाव, टेमघर धरणाच्या परिसरात पावसाने भरपूर दिवसापासून विश्रांती घेतली आहे.

पानशेत धरणातून पावर हाऊस सारे पाण्याचा विसर्ग सुरू होता हा विसर्ग शनिवारी बंद करण्यात आला आहे अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे अधिकारी विजय पाटील यांनी दिली.
खडकवासला धरण 100 टक्के भरले असून
93 टीएमसी इतका पाणीसाठा आहे तर धरणातून कालव्याद्वारे 1000 क्यूसकने विसर्ग सुरू आहे.
तर खडकवासला धरणातून आतापर्यंत 2.95
टीएमसी पाणी नदीत सोडण्यात आले आहे पानशेत धरणही शंभर टक्के भरले असून धरणांत 9.30 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
तर धरणात 11 .30 टीएमसी म्हणजे 93% पाणी साठा उपलब्ध आहे. तर टेमघर धरणात 85 टक्के म्हणजे 1.14 टीएमसी पाणीसाठा आहे.

Leave a Reply